शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

कुख्यात गुंड आप्पा लोंढेच्या खून प्रकरणातील ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा; तर ९ जणांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:25 IST

२८ मे २०१५ उरुळी कांचन येथील कुख्यात गुंड आप्पा लोंढे याची उरुळी कांचन शिंदवणे रस्त्यावर पहाटेच्या गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती

लोणी काळभोर : कुख्यात गुंड आप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील ६ जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोरख बबन कानकाटे यांचेसह ९ जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

या प्रकरणातील आरोपी संतोष मिनराव शिंदे (वय ३४  रा. शिंदवणे, ता. हवेली), निलेश खंडू  सोलनकर (वय ३०, रा.डाळिंब, दत्तवाडी ता. हवेली) राजेंद्र विजय गायकवाड (वय २४,  रा. शिंदवणे, ता. हवेली), आकाश सुनिल महाडीक (वय २०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) विष्णू यशवंत जाधव (  वय ३७, रा. माळवाडी, सोरतापवाडी, ता. हवेली) व नागेश लखन झाडकर (वय २७, रा.पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) या सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

तर या गुन्ह्यातील  मुख्य आरोपी गोरख बबन कानकाटे (रा. इमानदारवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) याचेसह नितीन महादेव मोगल (वय २७,) मनी कुमार चंद्रा उर्फ आण्णा (वय-४५  रा. कॉमर्स झोन, प्रेस कॉलनी रोड, सम्राट मित्र मंडळाजवळ, येरवडा, पुणे, मूळ रा. रामपूर जि. वारंगल, राज्य आंध्रप्रदेश)  विकास प्रभाकर यादव (वय ३१  रा. उरुळी कांचन, ता. हवेली), आण्णा उर्फ बबडया किसन गवारी (रा. मेमाणेवाडी, ता. दौंड जि. पुणे) प्रमोद उर्फ बापू काळूराम कांचन (रा.बायफ रोड उरुळी कांचन, ता. हवेली) सोमनाथ काळूराम कांचन (रा. उरळी कांचन, ता. हवेली),रविंद्र शंकर गायकवाड (रा. कांचन वृंदावन अपार्टमेंट उरुळी कांचन ता. हवेली) व प्रविण मारुती कुंजीर (रा. वळती, ता. हवेली) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

२८ मे २०१५ उरुळी कांचन येथील कुख्यात गुंड आप्पा लोंढे याची उरुळी कांचन शिंदवणे रस्त्यावर पहाटेच्या गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी १५ जणांवर पोलीसांनी आरोपत्र दाखल केले होते. या खटल्याचा आज गुरुवार (५ एप्रिल)  रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. यात विष्णू जाधव याच्यासह ६ जणांना न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर ९ जणांना निर्दोष मुक्त केले आहे. या खटल्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शिरस्थीकर यांनी दिला आहे. कुख्यात गुंड आप्पा लोंढे यांच्या खून प्रकरणातील  मुख्य आरोपी गोरख कानकाटे याला सदर गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले असले तरी तो सध्या भाऊ लोंढे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय