शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

बँक आॅफ महाराष्ट्राच्या अध्यक्षांसह ६ अधिकाऱ्यांना २७ जून पर्यंत पोलीस कोठडी, डीएसके गैरव्यवहार प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 7:20 PM

बँकेच्या अधिकाऱ्यांनी डीएसकेडीएल या कंपनीशी संगनमत करुन त्यांच्या अधिकार व अधिकारांचा दुरुपयोग केला़.

ठळक मुद्देडीएसकेएल या कंपनीने सोलापूर रोडला ड्रिम सिटी प्रकल्पासाठी जमिनी खरेदी करण्यास मार्च २००७ पासून सुरुवातवेगवेगळ्या पार्टनरशिप फर्म स्थापन करुन व अस्तित्वात असलेल्या दोन अशा आठ फर्मद्वारे १०८३ कोटी जमा

पुणे: बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी गैरव्यवहार व पदाचा गैरवापराचा ठपका ठेवत अटक करण्यात आलेल्या बँक आॅफ महाराष्ट्राच्या अध्यक्षांसह सहा अधिकाऱ्यांना आरोपींना गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांनी बुधवारी (दि.२०जून ) अटक केली. या सर्व आरोपींना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या सर्व अधिकाऱ्यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.  याप्रकरणी बँक आॅफ महाराष्ट्राच्या अध्यक्ष रविंद्र मराठे यांच्यासह राजेंद्रकुमार वेदप्रकाश गुप्ता, एस.एम.घाटपांडे , राजीव नेवासकर, सुशिल मुहनोत आणि नित्यानंद देशपांडे अशी पोलीस कोठडी ठोठावलेल्या आरोपी अधिकाऱ्यांची नावे आहे. जितेंद्र नारायण मुळेकर (वय.६५ वर्ष, कोथरुड ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डी़. एस़. कुलकर्णी यांच्या डीएसकेएल या कंपनीने सोलापूर रोडला ड्रिम सिटी प्रकल्पासाठी जमिनी खरेदी करण्यास मार्च २००७ पासून सुरुवात केली होती़. बँकेच्या अधिकाऱ्यांनी डीएसकेडीएल या कंपनीशी संगनमत करुन त्यांच्या अधिकार व अधिकारांचा दुरुपयोग केला़. गैरवापर व गैरव्यवहार करुन कंपनीला कर्ज मंजूर केले, असा ठपका ठेवून त्यांना आज आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़. तसेच डी़ एस़ कुलकणी आणि हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने जवळपास ३७ हजार पानी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे़.  सरकारी वकील युक्तिवाद करताना म्हणाले, या गैरव्यवहारात अजून कुणी बँक कर्मचाऱ्यांचा समानवेश आहे का? तसेच वेगवेगळ्या पार्टनरशिप फर्म स्थापन करुन व अस्तित्वात असलेल्या दोन अशा आठ फर्मद्वारे १०८३ कोटी जमा करण्यात आले . यासर्वांमध्ये घाटपांडे यांची भूमिका काय, एन.सी.डी. (नॉन कर्न्व्हटेबल डिबेंचर ) च्या पैशांचा विनियोग योग्य व त्याच उद्दिष्टासाठी झालेला नसताना घाटपांडे यांनी कोणाच्या सांगण्यावरुन खोटा दाखला तयार करत तो खरा असल्याचे दाखविले याचा  सखोल तपास करावयाचा आहे, बँक आॅफ महाराष्ट्र, स्टेट बँक आॅफ इंडिया, विजया बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक, आय.डी.बी.आय या बँकांसह इतर बँकांनी दिलेल्या कर्जाच्या नावाखाली पैशांचा विनियोग दाखले वस्तुस्थिती दर्शक नसून खोटे असून ते घाटपांडे यांनी तयार केले असून त्यात सदरचे आरोपी मराठे , गुप्ता, देशपांडे, मुहनोत यांची यात भूमिका काय होती या सर्व गोष्टींचा उलगडा करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी. ही मागणी ग्राह्य धरताना न्यायालयाने आरोपींना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली. 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीbankबँकfraudधोकेबाजीCrimeगुन्हाPoliceपोलिस