शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या खात्यातून काढले परस्पर ६ लाख; कर्वे रोड परिसरातील प्रकार, बँक, एजंटचा इन्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:24 IST

महिलेच्या खात्यातून बँकेच्या एजंटने कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तब्बल ६ लाख रुपये परस्पर काढून घेण्याचा प्रकार कर्वे रोडमध्ये उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देकराड अर्बन सहकारी बँकेच्या शाखेत ३ एप्रिल २०१२ ते जानेवारी २०१७ च्या दरम्यान घडला प्रकारपैसे काढण्याच्या वेळी त्या स्वत: हजर असल्याचा बँकेचे अधिकारी, पिग्मी एजंटचा दावा

पुणे : महिलेच्या खात्यातून बँकेच्या एजंटने कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तब्बल ६ लाख रुपये परस्पर काढून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ हा प्रकार कराड अर्बन सहकारी बँकेच्या कर्वे रोड शाखेमध्ये ३ एप्रिल २०१२ ते जानेवारी २०१७ च्या दरम्यान घडला आहे़ मात्र, बँक अधिकारी व बँकेचे पिग्मी एजंट यांनी त्याचा इन्कार केला असून पैसे काढताना त्या स्वत: हजर असल्याचा दावा केला आहे़ याप्रकरणी हेमलता भालेराव (वय ५२, रा़ पौड रोड, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेराव यांचे पती दत्तात्रय चोरगे यांचे एप्रिल २०१२ मध्ये निधन झाले़ भालेराव यांच्या बँकेच्या रिकरिंग खात्यात पैसे भरण्याचे काम एजंट गणेश शिंदे हा करीत असे़ त्याने बनावट स्वाक्षरी करुन २२ जून २०१२ मध्ये त्यांच्या रिकरिंग खात्यातील ६ लाख ३६ हजार ६०६ रुपये काढून ते बचत खात्यात वर्ग केले़ त्यानंतर ४ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांची खोटी स्वाक्षरी करुन बचत खात्यातील ६ लाख ३६ हजार ५०० रुपये काढून फसवणूक केली असे फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरुन कोथरूड पोलिसांनी गणेश शिंदे (रा़ एरंडवणा) आणि कराड अर्बन सहकारी बँक कर्वे रोड शाखेतील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे़ मात्र, बँकेचे अधिकारी व पिग्मी एजंट गणेश शिंदे यांनी याचा इन्कार केला असून पैसे काढण्याच्या वेळी त्या स्वत: हजर असल्याचा दावा केला आहे़ अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे करीत आहेत़

टॅग्स :bankबँकPuneपुणे