शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

'आम्ही सहकारमंत्र्यांचे सचिव आहोत, गृहकर्ज कमी करून देतो', ज्येष्ठाला तब्बल ५९ लाखांचा गंडा

By विवेक भुसे | Updated: May 4, 2023 16:50 IST

बंगला विकत घेणाऱ्यांचा मंत्रीशी परिचय असून ते लिलाव झालेले घर त्यांना परत मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून ५९ लाख रुपये घेतले.

पुणे: सहकारमंत्र्यांचे सचिव असल्याचे सांगून गृहकर्ज कमी करुन देतो, तसेच लिलाव झालेला बंगला परत मिळवून देतो, असे सांगून एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी तब्बल ५९ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत येरवडा येथील एका ५९वर्षाच्या नागरिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोरख तनपुरे (वय ४०), विशाल पवार (वय ३५, दोघे रा. हडपसर), गगन केशव रहांडगळे (वय ३८, रा. नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कल्याणीनगरमध्ये ऑक्टोबर २०२१ ते आतापर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिलायन्स कंपनीतून सेवानिवृत्त असून त्यांची २ मुले अमेरिकेत नोकरी करतात.  त्यांनी वाघोली येथे बंगला विकत घेण्यासाठी एच डी एफ सी बँकेकडून ३ कोटी ३० लाखांचे कर्ज घेतले होते. कोरोनाच्या काळात गृहकर्जाचे हप्ते थकले. तेव्हा त्यांनी बंगला विकण्याचा निर्णय घेतला. त्यातून त्यांची इस्टेट एजेंट गोरख तानपुरे, विशाल पवार यांच्याशी ओळख झाली. बँकेने घरावर जप्ती आणल्याने त्यांना बंगला विकणे अवघड झाले. कर्जाची रक्कम ४ कोटी ८० लाख रुपये झाली. गोरख तनपुरे व विशाल पवार यांनी गगन रहांडगळे हा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे सचिव असल्याचे खोटे सांगून ओळख करुन दिली. त्याने बँकेचे गृहकर्ज कमी करुन देतो, त्यासाठी आम्हाला ३० लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यापैकी २५ लाख रुपये रहांडगळे याला दिले. मात्र, पैसे दिल्यानंतरही त्यांचे कर्ज कमी झाले नाही. शेवटी जप्ती केलेला बंगल्याची ५ कोटींना विक्री झाली. बंगला विकत घेणाऱ्यांचा मंत्रीशी परिचय असून  ते लिलाव झालेले घर त्यांना परत मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून ५९ लाख रुपये घेतले.

आघाडी सरकार पडल्याचा घेतला फायदा

त्यांच्या बंगल्याच्या लिलावासाठी संबंधितांनी ३० लाख रुपये स्टॅम्प डयुटी भरली आहे. ती द्यावी लागेल. मुले करारनाम्याला हजर राहून शकत नसल्याने जिल्हाधिकारी यांना मॅनेज  करण्यासाठी  २ लाख रुपये त्यांच्याकडून घेतले. परंतु, पैसे घेतल्यानंतरही ते कारणे सांगून करारनामा करण्याची टाळाटाळ करत होते. दरम्यान, जून २०२२ मध्ये आघाडी सरकार पडले. ते कारण सांगून पुन्हा त्यांनी टाळाटाळ सुरु केली. त्यांनी आपल्या वकीलाला हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी चौकशी केल्यावर असा कोणी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सचिव नसल्याचे समजले. फिर्यादी यांनी नोटीस पाठविल्यावर गगन रहांडगळे याने फोन करुन मी साहेबांची वेगळी कामे करतो. त्यामुळे माझी ओळख कोणी सांगणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांना गगन रहांडगळे याच्यावर नागपूरमध्येही फसवणूकीचा गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMONEYपैसाSenior Citizenज्येष्ठ नागरिक