शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

नटराजा,तुझ्या कृपेनेच आता रंगमंदिराचा पडदा लवकर उघडू दे! बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिनाला कलाकारांचं साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 12:59 IST

बालगंधर्व रंगमंदिराचा ५४ वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा करण्यात आला.

पुणे: बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे कलाकार मंडळी, नाट्यप्रेमी आणि पुणेकरांच्या अस्मितेचा विषय म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. आजवर सर्वांचं भरभरून प्रेम मिळालेल्या या रंगमंदिराचा आज वर्धापन दिसून आहे. दरवर्षी अतिशय उत्साहाने आणि विविध कलाकारांच्या आयोजनाने हा वर्धापन दिन साजरा केला जातो. मात्र, कोरोना संकटामुळे गेल्या एक ते सव्वा वर्षांपासून कलाकारांसह ह्या रंगमंदिराला देखील रसिकांच्या प्रेमाला मुकावे लागले आहे.मात्र आज वर्धापन दिनानिमित्त कलाकारांच्या उपस्थितीत यंदाच्या वर्षी साधेपणाने बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी बालगंधर्व रंग मंदिराचा पडदा उघडून त्याचे पूजन करण्यात आले. सर्वांनी नटराजाकडे लवकरात लवकर रंगमंदिरांचा पडदा उघडावा असं साकडे देखील घातलं.

कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूमुळे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन व शासनाच्या आदेशानुसार व सर्व नियमांचे पालन करत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचा ५४ वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा झाला. यावेळी बालगंधर्व रंग मंदिराचा पडदा उघडून त्याचे पूजन करण्यात आले.तिथे रीतसर नारळ फोडण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले.हा पडदा लवकरच उघडावा यासाठी सर्वांनी नाटराजकडे साकडे घातले.तसेच सर्व कलाकारांनी नेहमीप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिन निमित्ताने केक कापून साजरा केला. बालगंधर्व परिवारातर्फे १५ वर्षांपासून बालगंधर्व रंग मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो. ३ दिवसांच्या या सोहळ्यात भावगीत ,भक्तीगीतापासून लावणीपर्यंत सर्व कला आविष्कार साजरे केले जातात.

या कार्यक्रमाला पुण्याचे उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले ,जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, जेष्ठ अभिनेत्री रजनी भट,अभिनेते विजय पटवर्धन, बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते,निर्माते दत्ता दळवी, शशी कोठावळे सुमित कॅसेट चे सुभाष परदेशी,कलाकेंद्राचे अशोक जाधव,अण्णा गुंजाळ,सुनील महाजन,जतीन पांडे, प्रकाश पायगुडे,योगेश देशमुख,योगेश सुपेकर नाट्य चित्रपट परिवारातील मोजकेच पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते. 

उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी कलाकारांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवू व कलाकारांसाठी रंगमंच कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. मेघराज राजेभोसले म्हणाले,महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रिकामे गाळे गरजू कलाकारांना नाममात्र शुल्कात भाडे तत्वावर देण्यात यावे तसेच कलाकारांना शहरी गरीब योजनेचा थेट लाभ मिळावा तसेच छोटे खाणी स्वरुपात महानगर पालिकेच्या हद्दीत सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरcinemaसिनेमाTheatreनाटक