शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

53 तोळे सोने लुटले, दोन आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 23:16 IST

मुलाच्या केस संदर्भातील वकिलांनी दिलेली कागदपत्रे द्यायची आहेत असे सांगून अंगावरील तब्बल 53 तोळे सोने  लुटण्याचा प्रकार उघडकीस आला.

पुणे : मुलाच्या केस संदर्भातील वकिलांनी दिलेली कागदपत्रे द्यायची आहेत असे सांगून अंगावरील तब्बल 53 तोळे सोने  लुटण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सोलापूर जिल्हयातील दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चार चेन, तीन ब्रेसलेट, दोन अंगठ्या, विओ कंपनीचा मोबाईल असा 13 लाख 37 हजार 500 रूपयांचा माल हस्तगत करण्यात आलाआहे.या गुन्हयात पाच आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. रणजित आनंदराव कांबळे ( वय 25 वर्षे, रा. मु.पो भाळवणी, ता.पंढरपूर जि. सोलापूर) आणि सचिन हनुमंत कुरळे (रा.उघडेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये गस्त घालत असताना दोनव्यक्ती कात्रज बायपास चौकात थांबले आहेत आणि त्यांच्याकडे सोन्याचे दागिने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले असता कांबळे यांच्या पँटच्या खिशात एक प्लँस्टिकची पिशवी आढळली त्यामध्ये 53 तोळ्याचे सोन्याचे दागिने सापडले. हे दोन आरोपी काही दिवसांपूर्वीच पुण्यात आले. फिर्यादी मुकेश शेलार यांची कर्वेनगर परिसरात ज्यूसची गाडी आहे, त्यांचा मुलगा एका खुनाच्या गुन्हयात येरवडा कारागृहात आहे. त्यामुळे मुलाच्या संदर्भातील वकिलांनी दिलेली कागदपत्रे द्यायची आहेत असे सांगून शेलार यांना पोतनीस परिसरात बोलावून आरोपी व त्यांचे साथीदार तेजस जाधव, रामभाऊ डावरे व त्याचा मित्रयांनी मिळून त्याला एका गाडीत घातले आणि जबरदस्तीने पुणे बँगलोर हायवेवर नेऊन चाकूचा धाक दाखवित, मुलाला ठार मारण्याची धमकी देत लुबाडले. त्यानंतर फिर्यादीला खेड शिवापूर येथे सोडून दिले. शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अशाप्रकारचे काही गुन्हे केले आहेत का? यासह फरारी आरोपीचा तपास चालू असल्याचे परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे तसेच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डी आर मोहिते, कर्मचारी कृष्णा निढाळकर, चंद्रकांत फडतरे, प्रणव संकपाळ, उज्वल मोकाशी, अमोल पवार, गणेश चिंचकर, शिवदत्त गायकवाड, महेश मंडलीक, कुंदन शिंदे, अभिजित रत्नपारखी यांनी केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा