शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ५२ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:49 IST

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ५२ लाख ७७ हजारांचा आर्थिक गंडा घातला ...

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ५२ लाख ७७ हजारांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी, कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.उंड्री येथील राम कुमार (६३) यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी ३६ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फिर्यादी घरी असताना, सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आशयाची जाहिरात पाठवली. त्यानंतर फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. पुढे त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे भरून घेतले. यानंतर त्यांना कोणतीच रक्कम परत करण्यात आली नाही.दुसऱ्या घटनेत येवलेवाडी, कोंढवा येथील दत्तात्रय यादव गुळूमकर (५२) यांना देखील सायबर ठगांनी अशाच प्रकारे १६ लाख २५ हजारांचा आर्थिक गंडा घातला आहे. शेअर स्टाॅक आणि आयपीओ खरेदीच्या बहाण्याने त्यांना चांगला नफा मिळेल, असे प्रलोभन दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरात शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरटे नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहेत. मात्र, असे असताना देखील कोणत्याही प्रकारची खात्री न करता नागरिक देखील आपला पैसा सायबर चोरांच्या हवाली करत आहेत.क्रेडिट कार्डच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूकक्रेडिट कार्डचे कॅश पाॅइंट संपत आल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी येवलेवाडी येथील श्रद्धा संदीप नारवेकर (४५) या महिलेची २ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फिर्यादींना एक ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यामध्ये त्यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन पैसे काढून घेतले. याप्रकरणी, महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Puneपुणेshare marketशेअर बाजारPoliceपोलिस