शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याला रिक्त पदांची अवकळा, मान्य पदांपैकी ५१८ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 03:46 IST

पुणे शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभागाची महत्त्वाची मानली जाते. मात्र, रिक्त पदांमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागालाच आपल्या कामाचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

- विशाल शिर्केपुणे - शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभागाची महत्त्वाची मानली जाते. मात्र, रिक्त पदांमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागालाच आपल्या कामाचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आरोग्य विभागाच्या मान्य जागांपैकी तब्बल ५१८ पदे रिक्त असल्याची माहिती हाती आली आहे. ही पदे तातडीने भरण्याची मागणी आरोग्य विभागाने महापालिकेकडे केली आहे. करार पद्धतीतील अल्प वेतनामुळे पदभरतीला प्रतिसाद मिळत नसल्याचेदेखील आरोग्य विभागाने महापालिकेला कळविले आहे.आरोग्य खात्याच्या नियंत्रणाखालील रुग्णालयांमधील खाटांची (बेड) संख्या वाढविण्यात आली असून, अनेक वैद्यकीय विभागांच्या संख्येतदेखील वाढ करण्यात आली आहे. याशिवाय आरक्षित जागांमध्ये नव्याने सुरू करावयाची प्रसूतिगृहे, हेल्थ सेंटर, वस्ती क्लिनिक या ठिकाणी वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीच्या पदांची आवश्यकता आहे. याबाबत महापालिकेला कळवूनदेखील पालिकेने त्यावर कोणताच ठोस निर्णय घेतलेला नाही. आरोग्य विभागासाठी वर्ग एक ते चार या श्रेणीतील १ हजार ६६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५१८ पदे रिक्त आहेत. ही संख्या मंजूर पदांच्या तब्बल ३१ टक्के इतकी होते. या सर्वबाबींसह आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी पत्राद्वारे महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे.आरोग्य विभागाकडील सर्व दवाखाने, प्रसूतिगृह, रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यासाठी तसेच नवजात अतिदक्षता विभाग सुरू करण्याकरिता श्रेणी एक ते चार या संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. अन्यथा शहरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणे अडचणीचे ठरणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. साबणे यांनी नमूद केले आहे. रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणे अवघड होईल, असेही पत्रात म्हटले आहे.एमबीबीएस बजावतातस्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिकामहापालिकेकडे १८ प्रसूतीगृहे आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी त्यांचे कामकाज एमबीबीएस पदाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करावे लागते. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात २२ मार्च २०१८ रोजी गंभीर परिस्थितीतील महिला रुग्ण दाखल झाली होती. अशा वेळी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या अभावी एमबीबीएस वैद्यकीय अधिकाºयांकडून कामकाज करावे लागले. त्यामुळे अडचणी निर्माण होऊन अप्रिय घटनादेखील घडली आहे, अशा अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेच्या प्रसूतीगृहामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ असणे अत्यंत आवश्यक असल्याचा अभिप्राय महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी पत्रात नोंदविला आहे.वेतनश्रेणीमुळे तज्ज्ञडॉक्टर फिरकेनातविशिष्ट विषयातील तज्ज्ञ डॉक्टर्सना पुरेशी वेतनश्री मिळत नसल्याने ते महापालिकेच्या सेवेकडे पाठ फिरवित आहेत. सध्या एमबीबीएससाठी ६० ते ७० हजार रुपये महिना वेतन देण्यात येते. मात्र, त्याच वेतनात बालरोग, स्त्रीरोग, नवजात अर्भकतज्ज्ञ अथवा सुपरस्पेशालिटी डॉक्टर तयार होत नाहीत. त्यामुळे सेवेतील अथवा सेवेत येणाºया एमबीबीएस डॉक्टर्सला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहन दिले जाते, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाºयांनी दिली.आयसीयू फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, नेत्रशल्यचिकित्सक, जीवशास्त्रतज्ज्ञ, तंत्रज्ञ हृदयरोग, नवजात अर्भकतज्ज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळातज्ज्ञ, निरीक्षक हिवताप, कीटक संघटक, शस्त्रक्रियागृहातील सहायक अशा विविध २० संवर्गातील पदे रिक्त आहेत.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य