राममंदिरासाठी ‘दगडूशेठ गणपती’ ट्रस्टतर्फे ५१ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:13 IST2021-01-19T04:13:50+5:302021-01-19T04:13:50+5:30
पुणे : श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या मंदिर निर्माणासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ५१ लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात ...

राममंदिरासाठी ‘दगडूशेठ गणपती’ ट्रस्टतर्फे ५१ लाख
पुणे : श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या मंदिर निर्माणासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ५१ लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. या अभियानासाठी पुण्यात आलेल्या साध्वी ॠतंभरा यांच्याकडे पहिल्या टप्प्यातील ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी उपस्थित होते. साध्वी ॠतंभरा यांनी यावेळी गणरायाला अभिषेक केला. त्यांच्या हस्ते गणपतीची आरतीही करण्यात आली.
साध्वी ॠतंभरा म्हणाल्या की, लवकरच संपूर्ण जगाला अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्यतेचे दर्शन घरेल. रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाच्या चरणी जे मागितले होते, ते चार महिन्यांतच मिळाले. आता राममंदिराच्या माध्यमातून हिंदूंचा जो संकल्प आहे, तो निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत. तसेच फक्त मंदिर न बनविता मंदिरे पुन्हा कधीही उध्वस्त होऊ नये, अशा भारताची निर्मिती करुया. अशोक गोडसे म्हणाले, “अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मीतीकरीता संपूर्ण जगभरातून निधी येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे खारीचा वाटा म्हणून ५१ लाख रुपयांचा निधी देत आहोत.”