ओतूर शहरात दोन दिवसांत ५० नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:11 IST2021-05-27T04:11:40+5:302021-05-27T04:11:40+5:30

ओतूर १०, हिवरे खुर्द ४, ध़ोलवड ४, रोहोकडी २, डिंगोरे खामुंडी ,नेतवडमाळवाडी ,उदापूर, डुंबरवाडी या प्रत्येक गावात एक एक ...

50 new patients in two days in Ootor city | ओतूर शहरात दोन दिवसांत ५० नवीन रुग्ण

ओतूर शहरात दोन दिवसांत ५० नवीन रुग्ण

ओतूर १०, हिवरे खुर्द ४, ध़ोलवड ४, रोहोकडी २, डिंगोरे खामुंडी ,नेतवडमाळवाडी ,उदापूर, डुंबरवाडी या प्रत्येक गावात एक एक असे २४ रुग्ण सापडल्याने परिसरातील बाधितांची संख्या २हजार २४५ झाली आहे. १ हजार ९८९ बरे झाले आहेत. १२६ कोविड सेंटर तर ४१ जण घरीच उपचार घेत आहेत. ८९ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती डॉ. सारोक्ते व डॉ. यादव शेखरे यांनी दिली.

ओतूर शहरात मंगळवारी ११, बुधवारी १० असे नवीन रुग्ण सापडले त्यामुळे शहरातील परिस्थिती चिंताजनक आहे. ओतूर शहरातील बाधितांची संख्या ९७१ झाली आहे. ८७७ बरे झाले आहेत. ३२ जण कोविड सेंटर, तर ३६ जण घरीच उपचार घेत आहेत. ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. डिंगोरे येथील २४३ पैकी२१० बरे झाले आहेत.२४ जण उपचार घेत आहेत. ९ जणांचा मृत्यू झाला आहे .

धोलवड येथील ११० पैकी ९८ बरे झाले आहेत, ७ जण उपचार घेत आहेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

खामुंडीने शतक पूर्ण केले आहे पैकी ८९ बरे झाले आहेत. ५ जण उपचार घेत आहेत, ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

.

Web Title: 50 new patients in two days in Ootor city