पन्नास लाखांची रोकड लुटणाऱ्यांनी दिली कबुली
By Admin | Updated: August 13, 2015 04:34 IST2015-08-13T04:34:37+5:302015-08-13T04:34:37+5:30
गेल्या वर्षी वरवे येथील पेट्रोलपंपावरील ५० लाखाची रोकड लुटणाऱ्या तिघांनी राजगड पोलिसांना कबुली दिली आहे. गेल्या वर्षी दि.१३ जुलै रोजी वर्वे येथुन केळवडे व वर्वे येथील

पन्नास लाखांची रोकड लुटणाऱ्यांनी दिली कबुली
नसरापूर : गेल्या वर्षी वरवे येथील पेट्रोलपंपावरील ५० लाखाची रोकड लुटणाऱ्या तिघांनी राजगड पोलिसांना कबुली दिली आहे.
गेल्या वर्षी दि.१३ जुलै रोजी वर्वे येथुन केळवडे व वर्वे येथील पेट्रोलपंपावरील पन्नास लाखाची रोकड पुण्यातील बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना जुन्या कात्रज बोगद्याच्या घाटाच्या सुरुवातीस असलेल्या पुलाखाली कारच्या पुढे दुचाकी आडवी घालुन ५० लाखाची रोकड ४ ते ५ जणांनी लंपास केलेली होती.
याप्रकरणी राजगड पोलिसांनी मंदार चोरघे, राजेंद्र वाडघरे व आशिष घोड यांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याची कबुली वरील तिघांनी राजगड पोलिसांना दिली आहे. (वार्ताहर)