उच्चशिक्षित पतीला 5 वर्षे सक्तमजुरी

By Admin | Updated: July 9, 2014 23:51 IST2014-07-09T23:51:17+5:302014-07-09T23:51:17+5:30

आत्महत्येस प्रवृत्त करणा:या संगणक अभियंत्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अतुल म. कु:हेकर यांनी 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

5 years valid for a highly educated husband | उच्चशिक्षित पतीला 5 वर्षे सक्तमजुरी

उच्चशिक्षित पतीला 5 वर्षे सक्तमजुरी

पुणो : कार घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावून, उच्च शिक्षित विवाहितेचा  छळ करून, तिला आत्महत्येस प्रवृत्त करणा:या संगणक अभियंत्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अतुल म. कु:हेकर यांनी 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तर, कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी सासूला न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.  
पती जितेंद्र यल्लप्पा पवार (28) व सासू रंजना यल्लप्पा पवार (5क् दोघेही रा. शिवतेजनगर, चिखली, मूळ रा. पारनेर, अहमदनगर) अशी शिक्षा सुनाविण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. श्वेता जितेंद्र पवार (24) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी श्वेताचे वडील हरिशचंद्र विष्णू धोत्रे (52 शिवराजनगर, रहाटणी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 
मृत्यूपूर्वी तिने लिहून ठेवलेली सुसाईड नोट, हस्ताक्षर तज्ज्ञांची साक्ष व  मुलीच्या वडिलांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील ए. एफ. बासीद यांनी आठ साक्षीदार तपासताना आरोपींना जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली. न्यायालयाने पतीला कौटुंबिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी, तर सासू रंजनाला कौटुंबिक छळप्रकरणी दोषी धरून शिक्षा सुनावली.(प्रतिनिधी)
 
4श्वेताचे शिक्षण एमसीएसर्पयत झाले होते. तर, जितेंद्र हा एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून नोकरीस होता. मे2क्क्9मध्ये लग्न झाल्यानंतर, जितेंद्र आणि श्वेता चिखली येथे भाडय़ाच्या घरात राहत होते. पुण्यात स्वत:चे घर व कार नसल्याने तो श्वेताला माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावत होता. याच कारणावरून  सासू आणि जितेंद्र तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. वारंवार होणारा त्रस सहन न झाल्याने, श्वेताने 22 ऑक्टो 2क्11 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

Web Title: 5 years valid for a highly educated husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.