शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळा घाटातील बस अपघातात 5 जण ठार; 24 जखमी; चालकाचा ताबा सुटल्याने घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 09:33 IST

ही खाजगी प्रवासी बस कराडहून मुंबईच्या दिशेने एक्सप्रेस वेला लागूनच असलेल्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गारमाळ घाटातून खाली उतरत असताचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला

लोणावळा : मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा बोरघाटा लगतच्या गारमाळ घाटातील वळणावर खाजगी प्रवासी बस पलटी झाल्याने या बस मधील पाच प्रवाश्यांचा मृत्यु झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात बस रस्त्यावरुन काही फुट दरी गेली आहे.

सर्वज्ञा सचिन थोरात (वय 3, रा. कराड), स्नेहा जनार्दन पाटील (वय 15, रा. घाटकोपर), जनार्दन पाटील (वय 45, रा. घाटकोपर), संजय शिवाजी राक्षे (वय 50, रा. पवई) व प्रमिला रामचंद्र मोहिते (वय 50, रा. बेलवले बु. कराड) अशा पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार (एमएच 04 एफके 1599) ही खाजगी प्रवासी बस कराडहून मुंबईच्या दिशेने एक्सप्रेस वेला लागूनच असलेल्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गारमाळ घाटातून खाली उतरत असताचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व बस रस्ता सोडून काहीशी खोल दरीत गेली. यामुळे झालेल्या अपघातात गाडीमधील एक लहान मुलीसह चार जणाचा मृत्यु झाला तर 24 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीपैकी 13 जणांना गंभिर स्वरुपाचा मार लागला आहे. सर्व जखमींवर एमजीएम हाँस्पिटल कामोठे, पवना हाँस्पिटल सोमाटणे, लोकमान्य हाँस्पिटल निगडी, खोपोली हाँस्पिटल याठिकाणी उपचार सुरु आहेत. महामार्ग पोलीस यंत्रणा, देवदूत पथक, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक  संघटनेचे कार्यकर्ते यांनी सर्व मयत वजखमी यांना बाहेर काढत जखमींना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईhighwayमहामार्ग