शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अनुदानाचे २३ जिल्ह्यांत ४६६ कोटींचे होणार वितरण; तब्बल ३ लाखाहूनही अधिक शेतकरी अनुदानास पात्र

By नितीन चौधरी | Updated: August 21, 2023 15:33 IST

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान लेट खरीप हंगामातील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता

पुणे: फेब्रुवारीत कांदा दरात घसरण झाल्यानंतर राज्य सरकारने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुमारे ३ लाख ३६ हजार ४७६ शेतकरी अनुदानास पात्र ठरले असून पहिल्या टप्प्यात १० कोटी व त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या २३ जिल्ह्यांना सुमारे ४६६ कोटींचे अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

राज्यात फेब्रुवारीत कांद्याच्या दरात घसरण झाल्याने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान लेट खरीप हंगामातील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार, प्रति क्विंटल ३५० रुपये तसेच जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकऱ्याला अनुदान देण्याचे ठरले होते. त्यानुसार पणन संचालनालयाने शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते. राज्यातून ४ लाख १३ हजार ८३ शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज केले होते. छानणीनंतर ३ लाख ३६ हजार ४७६ शेतकरी पात्र ठरले आहेत. तर ७६ हजार ६०७ शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरले आहेत.

२२ कोटींचे वितरण झाले

यासाठी पणन संचालनालयाने राज्य सरकारकडे ८४४ कोटी ५६ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी राज्य सरकारने ४६५ कोटी ९९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. सातारा, सांगली, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नागपूर, रायगड, यवतमाळ, अकोला, वाशिम या दहा कोटी रुपयांपेक्षा कमी अनुदान असलेल्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण अनुदानाची रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याशिवाय १० कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदानाची रक्कम असलेल्या पुणे, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, बीड, कोल्हापूर या दहा जिल्ह्यातील उत्पादकानांना ५३.९४ टक्के या प्रमाणात अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. शिल्लक निधी उपलब्ध केल्यानंतर उर्वरीत पात्र लाभार्थ्यांस वितरीत करण्यात येणार आहे. १० कोटींपेक्षा कमी असलेल्या १३ जिल्ह्यांसाठी २२ कोटी ६० लाख ५१ हजार ९७४ रुपयांची गरज होती. त्यानुसार सर्व रक्कम वितरीत करण्यात आली. तसेच १० कोटी पेक्षा जास्त अनुदान असलेल्या १० जिल्ह्यात ४४३ कोटी ३७ लाख ३३ हजार ९९४ रुपयांची गरज होती. त्यापैकी ३७८ कोटी ५८ लाख ९५ हजार ८०७ रुपयांचे वाटप केले जाणार आहे.

पुण्यात ३६ कोटींचे होणार वितरण

पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना ५४.९४ टक्के प्रमाणात निधी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या ६६ कोटी ८९ लाख सहा हजार ६९८ एवढा निधी आवश्यक आहे. त्यानुसार, सध्या ३६ कोटी आठ लाख १९ हजार ६४५ एवढा निधी वितरीत केला जाणार आहे. तसेच ३० कोटी ८० लाख ८७ हजार ५३ रुपयांचा निधी शिल्लक राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेonionकांदाFarmerशेतकरीSocialसामाजिकGovernmentसरकारMarketबाजार