शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या नगरसेवक-अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय सुविधांवर ४६ कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 21:33 IST

वैद्यकीय सहाय्य योजनेंतर्गत शहरातील १७ हजार २७४ कुटुंबांना साहाय्य

ठळक मुद्दे स्थायी समितीच्या बैठकीत वर्गीकरणातून याकरिता १० कोटी रूपये उपलब्ध

पुणे : शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेंतर्गत शहरातील १७ हजार २७४ कुटुंबांना साहाय्य करणाऱ्या महापालिकेने, आजी माजी नगरसेवक व मनपा सेवकांवर डिसेंबर,२०१९ अखेर ४६ कोटी १७ लाख ७३ हजार ८२५ रूपये खर्च केले आहेत. अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेतून हा खर्च करण्यात आला असून, आता निधी कमी पडल्याने स्थायी समितीच्या बैठकीत वर्गीकरणातून याकरिता १० कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालिकेच्या सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेसाठी ४६ कोटी, ६० लाख २० हजार १२५ रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती़. यामध्ये वर्गीकरणातून उपलब्ध केलेल्या निधीचाही समावेश आहे़ दरम्यान यापैकी ९९ टक्के निधी डिसेंबर,२०१९ अखेरपर्यंतच खर्च झाला आहे़. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेकरिता ३८ कोटी ६४ लाख रूपये निधीचे वैद्यकीय साहाय्य करतानाच, यादरम्यान पालिकेचे विद्यमान नगरसेवकांच्या वैद्यकीय उपचारांवर १ कोटी ६६ लाख १५ हजार ६७८ रूपये, माजी नगरसेवकांच्या वैद्यकीय उपचारावर ९९ लाख ८२ हजार ७२२ रूपये ३१ डिसेंबर,२०१९ अखेर खर्च झाले आहेत़ याचबरोबर पुणे महापालिकेच्या सेवक वर्गावर व सेवानिवृत्त सेवकांवर ३४ कोटी ९९ लाख,९४ हजार,४८७ रूपये, पीएमपीएमएल आजी माजी सेवक वर्गावर ५ कोटी ५२ लाख, १६ हजार ९३८ रूपये व शिक्षण मंडळ आजी माजी सेवकांवर २ कोटी ९९ लाख ६४ हजार रूपये खर्च झाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्य