४५ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:10 IST2021-03-25T04:10:43+5:302021-03-25T04:10:43+5:30
पुणे : एका ४५ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडील रक्कम लुटण्यात आली. त्यानंतर दगडाने डोक्यात प्रहार करून मृतदेह कॅनॉलमध्ये ...

४५ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला; दोघांना अटक
पुणे : एका ४५ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडील रक्कम लुटण्यात आली. त्यानंतर दगडाने डोक्यात प्रहार करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.
सतीश सुतार (वय २६) आणि मिलिंद सोनबा पवळे (वय २९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राहुल नेने (वय ४५) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत राहुल यांच्या भावाने फिर्याद दिली आहे. ही घटना १४ मार्च रोजी धायरी फाटा परिसरात घडली.
राहुल यांचे अपहण करून त्यांच्याकडून एकूण ११ हजार ४०० रुपये काढून घेत त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला. याप्रकरणी सुतार, पवळे यांना न्यायालयात हजर केले असता गुन्ह्यातील ११ हजार ४०० रुपये हस्तगत करण्यासाठी त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का?, गुन्हा करण्यामागचा त्यांचा हेतू काय होता? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.