शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पुलांसाठी साडेचार कोटींचा निधी

By admin | Updated: March 23, 2017 04:10 IST

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुलांची बांधणी करण्यासाठी २ कोटी ९७ लाख व रस्तेदुरुस्तीसाठी

मंचर : पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुलांची बांधणी करण्यासाठी २ कोटी ९७ लाख व रस्तेदुरुस्तीसाठी १ कोटी ५४ लाख याप्रमाणे ४ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या टप्पा १० व ११ अंतर्गत आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यांतील पुलांना निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये प्रजिमा १० बी ते आंबेदरा, ता. आंबेगाव रु. ६७.१३ लक्ष, टाकळकरवाडी, ता. खेड रु. ६५.०१ लक्ष, कोरेगाव ते कळुस, ता. खेड रु. ९५.६३ लक्ष व मांडवे ते जांभुळशी, ता. जुन्नर रु. ६९.५५ लक्ष याप्रमाणे पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत आंबेगाव तालुक्यातील चिंचोली चास साकोरे रस्ता सुधारणा करणे रु. १८ लक्ष, प्रजिमा ६ ते ठाकरवाडी रस्ता सुधारणा करणे रु.९ लक्ष, खेड तालुक्यातील शेलू ते भांबोली रस्ता सुधारणा करणे १७ लक्ष, खेड ते बहिरवाडी रस्ता सुधारणा करणे रु. ४ लक्ष, जुन्नर तालुक्यातील मांडवे ते जांभुळशी रस्ता सुधारणा करणे १५ लक्ष, राष्ट्रीय महामार्ग २२२ ते कोल्हेवाडी रस्ता सुधारणा करणे रु. २० लक्ष, शिरूर तालुक्यातील आमदाबाद ते चानखनबाबावस्ती रस्ता सुधारणा करणे रु. १८ लक्ष, प्रजिमा ५३ ते पिंपळाचीवाडी रस्ता सुधारणा करणे रु. ४.५० लक्ष, रामा ६० टाकळीभीमा बाळोबाचीवाडी रस्ता सुधारणा करणे रु. ३ लक्ष व हवेली तालुक्यातील लोणीकंद ते झिरखेवसती रस्ता सुधारणा करणे रु. १८ लक्ष, प्रजिमा वाडेबोल्हाई ते शिंदेगायकवाडवस्ती रस्ता सुधारणा करणे रु. ४ लक्ष याप्रमाणे रस्त्यांची सुधारणा व अन्य काही रस्त्यांची किरकोळ दुरुस्ती करण्याकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे.पंतप्रधान ग्रामसडक योजना ही केंद्राची योजना असून, या योजनेअंतर्गत स्थानिक खासदारांमार्फत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येतात. (वार्ताहर)