पिंपरी : टीईटी अनिवार्यतेविरोधात विविध शिक्षक संघटनांनी शुक्रवारी (दि.५) पुकारलेल्या राज्यव्यापी संपात पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ४०० शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक सहभागी झाले होते. दरम्यान, विविध शिक्षक संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला.
पिंपरी-चिंचवड शहरात १५० खासगी मराठी अनुदानित शाळा आहेत. तसेच, २० अंशतः अनुदानित आणि एक आश्रम शाळा आहे. या शाळांमधील शिक्षकांनी या संपात सहभाग घेतला. त्यामुळे या शाळांमधील शिक्षक गैरहजर होते. जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड आणि सचिव शिवाजी कामथे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी पडवळ, सचिव गणेश काळे, खजिनदार अजय राऊत, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण बरडे, तर हवेली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र पानसरे आणि सचिव आबा जाधव हे या संपात सहभागी झाले होते. दरम्यान, या संपात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच महापालिका शाळांमधील शिक्षकांनी सहभाग घेतला नाही.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
टीईटी परीक्षा व १५ मार्च २०२४ चा संच मान्यता निर्णय रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी द्यावी. रिक्त पदभरती आणि कंत्राटीकरण बंद करावे, सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर पदे १०० टक्के भरावीत आदींसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हा संप करण्यात आला होता. दरम्यान, संपात सहभागी शिक्षकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेचा संपात सहभाग नाही
महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचा ९ नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला होता. दिल्ली येथील टीईटी विरोधातील धरणे आंदोलनातही संघटनेचा सहभाग होता. त्यामुळे शुक्रवारच्या संपात आमच्या संघटनेने सहभाग घेतला नाही. महापालिका शाळांंमधील आमच्या संघटनेचा एकही शिक्षक या संपात सहभागी झाला नसल्याचे संघटनेचे राज्य सरचिटणीस मनोज मराठे यांनी सांगितले.
Web Summary : Around 400 teachers in Pimpri-Chinchwad struck against mandatory TET. They marched to the Collector's office demanding the cancellation of TET and implementation of old pension schemes. Private English medium and municipal school teachers did not participate.
Web Summary : पिंपरी-चिंचवड में लगभग 400 शिक्षक अनिवार्य टीईटी के खिलाफ हड़ताल पर रहे। उन्होंने टीईटी रद्द करने और पुरानी पेंशन योजनाओं को लागू करने की मांग करते हुए कलेक्टर कार्यालय तक मार्च किया। निजी अंग्रेजी माध्यम और नगर निगम के स्कूलों के शिक्षकों ने भाग नहीं लिया।