शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ण पैसे न घेता विकल्या ४० मोटारी; दीड कोटींच्या फसवणूकप्रकरणी तिघांविरुद्ध पुण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:21 IST

सिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या महिलेने ग्राहकांचे पूर्ण पैसे आलेले नसतानाही परस्पर डिस्काऊंट देऊन ४० गाड्या विकून सेहगल कंपनीची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल वानवडी पोलिसांनी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देलेखी परवानगी न घेता ग्राहकांना डिस्काऊंटच्या नावाखाली विकल्या़ ४० चारचाकी गाड्यासर्व मिळून एकूण १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक

पुणे : सिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या महिलेने ग्राहकांचे पूर्ण पैसे आलेले नसतानाही परस्पर डिस्काऊंट देऊन ४० गाड्या विकून सेहगल कंपनीची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल वानवडी पोलिसांनी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी कन्वरजितसिंग सेहगल (वय ४५, रा़ बाणेर रोड) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ ही घटना एप्रिल ते ८ सप्टेंबर २०१७ दरम्यान फातिमानगर येथील मारुती सुझुकीचे नेक्सा ब्रॅन्डचे शो रुममध्ये घडला़ पोलिसांनी सिनियर रिलेशनशीप मॅनेजर जयेश उल्लास वेंगुर्लेकर, कंपनीचा डिलिव्हरी कॉडिनेटर संदीप रंगनाथ शिंदे, रिलेशनशीप मॅनेजर महिला व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला रिलेशनशीप मॅनेजर म्हणून नोकरी करीत असताना वेंगुर्लेकर व शिंदे यांच्याशी संगनमत करुन फिर्यादी अथवा कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी न घेता ग्राहकांना डिस्काऊंटच्या नावाखाली ४० चारचाकी गाड्या विकल्या़ ग्राहकांनी या गाड्यांची पूर्ण रक्कम भरलेली नसतानाही ते भरले असे दाखवून तशा नोंदी केल्या़ त्यासाठी  कंपनीकडे पैसे भरणाऱ्या इतर ग्राहकांचे पैसे त्या ग्राहकांनी भरले असल्याचे दाखविले़ तसेच या महिलेने स्वत:चे नावे एक मोटारी करुन घेतली़ सेहगल यांचे शो रुममधून इतर व्यक्तींनी जमा केलेली रक्कम तिने स्वत:च्या फायदा करुन तिचे नावे करुन घेतली़ मोटारीची विकल्याचे दाखवून त्याचा इन्सेटिव्हही स्वत:च्या नावावर घेतला़ काही ग्राहकांनी कंपनीचे खात्यावर भरण्यासाठी दिलेली रोख रक्कम स्वत:कडे ठेवून ती कंपनीचे खात्यावर न भरता काही गाड्या कंपनीची प्रक्रिया पूर्ण न करता ग्राहकांना डिलेव्हरी केल्या आहेत़ अशा प्रकारे ही महिला व इतरांनी कंपनीमध्ये अफरातफर करुन सर्व मिळून एकूण १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक केली़ सहायक पोलीस निरीक्षक व्ही़ डी़ राऊत अधिक तपास करीत आहेत़ 

टॅग्स :Puneपुणे