पूर्ण पैसे न घेता विकल्या ४० मोटारी; दीड कोटींच्या फसवणूकप्रकरणी तिघांविरुद्ध पुण्यात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:21 IST2017-12-28T16:20:34+5:302017-12-28T16:21:50+5:30
सिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या महिलेने ग्राहकांचे पूर्ण पैसे आलेले नसतानाही परस्पर डिस्काऊंट देऊन ४० गाड्या विकून सेहगल कंपनीची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल वानवडी पोलिसांनी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पूर्ण पैसे न घेता विकल्या ४० मोटारी; दीड कोटींच्या फसवणूकप्रकरणी तिघांविरुद्ध पुण्यात गुन्हा
पुणे : सिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या महिलेने ग्राहकांचे पूर्ण पैसे आलेले नसतानाही परस्पर डिस्काऊंट देऊन ४० गाड्या विकून सेहगल कंपनीची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल वानवडी पोलिसांनी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
याप्रकरणी कन्वरजितसिंग सेहगल (वय ४५, रा़ बाणेर रोड) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ ही घटना एप्रिल ते ८ सप्टेंबर २०१७ दरम्यान फातिमानगर येथील मारुती सुझुकीचे नेक्सा ब्रॅन्डचे शो रुममध्ये घडला़ पोलिसांनी सिनियर रिलेशनशीप मॅनेजर जयेश उल्लास वेंगुर्लेकर, कंपनीचा डिलिव्हरी कॉडिनेटर संदीप रंगनाथ शिंदे, रिलेशनशीप मॅनेजर महिला व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला रिलेशनशीप मॅनेजर म्हणून नोकरी करीत असताना वेंगुर्लेकर व शिंदे यांच्याशी संगनमत करुन फिर्यादी अथवा कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी न घेता ग्राहकांना डिस्काऊंटच्या नावाखाली ४० चारचाकी गाड्या विकल्या़ ग्राहकांनी या गाड्यांची पूर्ण रक्कम भरलेली नसतानाही ते भरले असे दाखवून तशा नोंदी केल्या़ त्यासाठी कंपनीकडे पैसे भरणाऱ्या इतर ग्राहकांचे पैसे त्या ग्राहकांनी भरले असल्याचे दाखविले़ तसेच या महिलेने स्वत:चे नावे एक मोटारी करुन घेतली़ सेहगल यांचे शो रुममधून इतर व्यक्तींनी जमा केलेली रक्कम तिने स्वत:च्या फायदा करुन तिचे नावे करुन घेतली़ मोटारीची विकल्याचे दाखवून त्याचा इन्सेटिव्हही स्वत:च्या नावावर घेतला़ काही ग्राहकांनी कंपनीचे खात्यावर भरण्यासाठी दिलेली रोख रक्कम स्वत:कडे ठेवून ती कंपनीचे खात्यावर न भरता काही गाड्या कंपनीची प्रक्रिया पूर्ण न करता ग्राहकांना डिलेव्हरी केल्या आहेत़ अशा प्रकारे ही महिला व इतरांनी कंपनीमध्ये अफरातफर करुन सर्व मिळून एकूण १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक केली़ सहायक पोलीस निरीक्षक व्ही़ डी़ राऊत अधिक तपास करीत आहेत़