Pune : व्यावसायिकावर गोळीबार करुन ४ लाख लुटले; गणेश कला क्रीडा मंच जवळील घटना
By विवेक भुसे | Updated: July 20, 2023 14:13 IST2023-07-20T14:11:09+5:302023-07-20T14:13:40+5:30
ही घटना गणेश कला क्रीडा मंचजवळील डायमंड हॉटेलसमोर घडली...

Pune : व्यावसायिकावर गोळीबार करुन ४ लाख लुटले; गणेश कला क्रीडा मंच जवळील घटना
पुणे : दुचाकीवरुन जाणार्या व्यावसायिकावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करुन जखमी केले. त्यांच्याकडील ४ लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गणेश कला क्रीडा मंचजवळील डायमंड हॉटेलसमोरील रोडवर घडला. लतेश हसमुखलाल सुरतवाला (वय ५१, रा. माणिकबाग) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीत आणि माडीत गोळी घुसली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतेश सुरतवाला यांचा नाना पेठेत तंबाखुचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या नोकराला घेऊन दुचाकीवरुन घरी जात होते. त्यांच्याजवळ ४ लाख रुपये असलेली बॅग होती. गणेश कला क्रीडा येथे आल्यानंतर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यात त्यांच्या पाठीत व मांडीत शिरल्याने ते जागीच कोसळले. तेव्हा गोळीबार करणार्यांनी त्यांच्याकडील ४ लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पाऊस असल्याने सीसीटीव्हीचे चित्रण धुरकट आले असल्याने पोलिसांच्या तपासात तो एक मोठा अडथळा ठरला आहे