शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चुलत भावाचा फोटो ‘डीपी’ला ठेवत व्यावसायिकाला ४ लाखांचा गंडा ; सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 15:26 IST

डीपीवर नातेवाईकाचा फोटो ठेवून फसवणूक करण्याचा हा पुण्यातील पहिलाच गुन्हा

पुणे : वेगवेगळ्या युक्त्या काढून लोकांना फसविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसतात. सायबर चोरट्यांचा एक नवा फंडा समोर आला आहे. व्हॉट्सॲपवरील डीपीवर परदेशातील चुलत भावाचा फोटो ठेवून त्याद्वारे कॉल करून भारतातील मित्राला पैशाची गरज असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला तब्ब्ल ४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे डीपीवर नातेवाईकाचा फोटो ठेवून फसवणूक करण्याचा हा पुण्यातील पहिलाच गुन्हा आहे.

याप्रकरणी पुणे विद्यापीठाजवळील आयसीएस कॉलनीत राहणाऱ्या एका ५३ वर्षांच्या व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बँक खातेदार, तसेच व्हॉट्सॲप वापरकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांचा चुलत भाऊ अमेरिकेत राहतो. १२ जुलै रोजी त्यांना एक व्हॉट्सॲप कॉल आला. त्यावर त्यांचा चुलत भावाचा फोटो लावला होता. त्यामुळे आपल्या चुलत भावाचा कॉल असल्याचा त्याचा समज झाला. पण, कॉलवर आवाज व्यवस्थित येत नव्हता. त्याने आवाजात खर खर असल्याचे सांगून भारतातील मित्राला मदतीची गरज असल्याचे सांगितले. मात्र, खर खर येत असल्याने त्यांना आपल्या चुलत भावाचा आवाज ओळखता आला नाही. त्यानंतर त्या नंबरवरून सायबर चोरट्याने त्यांच्या भावाच्या नावाने चॅटिंग सुरू केले. आपल्या भारतातील मित्राला वैद्यकीय कारणासाठी पैशाची गरज असल्याचे मेसेज करून सांगितले व त्यांना बँक खाते क्रमांक कळवून पैसे पाठविण्यास सांगितले. आपला चुलत भाऊच सांगत असल्याचे वाटून त्यांनी दिलेल्या नंबरवर ४ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र, हे करण्यापूर्वी आपण कोणाला कोठे पैसे पाठवितो, याची खात्री केली नाही.त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा चुलत भावाशी संपर्क झाल्यावर चुलत भावाने आपण असे काही मेसेज केले नसल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

......अशी घ्या काळजी... * अशाप्रकारे सायबर चोरट्यांकडून फसवणूक झाल्याप्रकरणी पुण्यात पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.* लोकांनी डीपीवर जरी आपल्या नातेवाइकांचा फोटो दिसला तरी तो नक्की त्यांचाच नंबर आहे का? याची खात्री करावी.* ज्यांना पैसे पाठवायला सांगितले, ते कोण आहेत, ते बँक खाते कोणाचे आहे, याची अगोदर खात्री करावी.* प्रत्यक्ष संपर्क साधून आपण ज्याला पैसे पाठवितो, ती तीच व्यक्ती आहे, याची खात्री पैसे पाठविण्यापूर्वी करावी.- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम