शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

जेजुरीत ४ लाख भाविकांची गर्दी, भरसोमवती अमावस्येनिमित्त भंडारा-खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 00:13 IST

दरवर्षी पौष पौर्णिमेला राज्यभरातील भटके विमुक्त, अठरापगड जाती-जमातीमधील भाविक आपापल्या कुटुंबकबिल्यासह जेजुरीला कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी येत असतात.

जेजुरी - दरवर्षी पौष पौर्णिमेला राज्यभरातील भटके विमुक्त, अठरापगड जाती-जमातीमधील भाविक आपापल्या कुटुंबकबिल्यासह जेजुरीला कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी येत असतात. यावर्षी ही पौषातील अमावस्या सोमवारी आल्याने भाविकांना एक चांगला योग आला. यामुळे भाविक मोठ्या संख्येने देवदर्शन करण्यासाठी काल रविवारपासूनच जेजुरीत येत होते.रविवारी रात्री ११.५१ वाजता अमावस्येला प्रारंभ होत असल्याने ग्रामस्थांनी भर सोमवती अमावस्या यात्रेचा निर्णय घेतला होता. संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्याने भाविक जेजुरीत मिळेल त्या वाहनाने येत होते.दुपारी १ वाजता पेशव्यांच्या आदेशाने देवाच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा कºहास्नानासाठी काढण्यात आला. यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे, विश्वस्त राजकुमार लोढा, संदीप जगताप, पंकज निकुडे, तुषार साहणे, अ‍ॅड. प्रसाद शिंदे, अ‍ॅड. अशोक सकपाळ उपस्थित होते. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने कºहास्नानासाठी कूच केले. यावेळी देव संस्थानच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. गडातील व गडकोटाच्या सज्जातील भाविकांनी ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ तसेच ‘सदानंदाचा यळकोट’चा जयघोष करीत भंडारा-खोबºयाची मोठ्या प्रमाणावर उधळण करीत देवाला मान दिला. संपूर्ण गडकोट पिवळ्याजर्द भंडाºयात न्हाऊन निघाला होता.तळपत्या सूर्यदेवाला साक्षी ठेवत पालखी सोहळा गडकोटातून कºहा स्नानासाठी बाहेर पडला. खांदेकरी, मानकºयांनी उत्सवमूर्तीची वजनाने खूप जड असणारी पालखी आपल्या खांद्यावर लीलया पेलत गडावरून शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंचबागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन जानुबाई चौकमार्गे शिवाजी चौकात सोहळा आला. तेथून कोथळे रस्त्याने सोहळ्याने कºहा नदीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी ५.३० वाजता देवाचे पुजारी, ग्रामस्थ मानकºयांनी उत्सवमूर्तीला विधिवत स्नान घातले. यावेळी नदीवर उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनीही कºहास्नान उरकून यात्रेचे पुण्य मिळवले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले.कोथळे, रानमळा, कोरपडवसती, दवणेमळा येथील मान स्वीकारत रात्री ७ वाजता सोहळा ग्रामदेवता जानुबाई मंदिरासमोर विसावला. येथे ग्रामस्थांनी उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. रात्री उशिरा सोहळा गडकोटावर पोहोचला.पेशव्यांनी रोजमारा वाटप करून सोहळ्याची सांगता झाली. पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, पदाधिकारी अमोल शिंदे, बबन बयास, अरुण खोमणे, पुजारी सेवकवर्गाने सोहळ्याचे नियोजन केले.भरसोमवती यात्रा असल्याने कालपासूनच भाविक जेजुरीत देवदर्शनासाठी येत होते. वाहतुकीवर ताण येऊ नये, म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी पोलीस कर्मचाºयांसह चोख बंदोबस्त ठेवला होता.जत्रा-यात्रा-उत्सवांमधील भोळ्याभाबड्या भाविकांची बाहेरील व्यापाºयांकडून मोठी फसवणूक झाल्याचे या यात्रेत निदर्शनाला आले. पिवळाजर्द भंडारा म्हणून बाहेरील काही व्यापाºयांनी भेसळीचा आणि मातीमिश्रित, पिवळी पावडर (यलो पावडर) भाविकांच्या माथी मारला, मागील काही वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी आणि देवसंस्थान समिती याबाबत संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येऊनदेखील दुर्लक्ष करण्यात येत आहे.मार्तंड देवसंस्थान आणि जेजुरी पालिका प्रशासनाकडून येणाºया भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ठिकठिकाणी टँकरचे नियोजन करण्यात आले होते. एसटी महामंडळाकडूनही जादा बसेसची सोय करण्यात आली होती. भेसळयुक्त भंडाºयाची मोठ्या प्रमाणात विक्री खंडेरायाच्या धार्मिक विधींमध्ये भंडाºयाला मोठे महत्त्व आहे. भंडारा-खोबरे खरेदी करून तळीभंडार करून देवाला अर्पण करणे आणि उधळण करीत देवाच्या नावाने जयघोष केल्याशिवाय येथील विधी पूर्ण होऊच शकत नाहीत, मात्र राज्यातून येणाºया भाविकांच्या श्रद्धेचा येथे मोठा गैरफायदा घेण्याचा प्रकार होतो.

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरी