शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पुण्यात 'या' कारणामुळे तब्बल ४ तास वीजपुरवठा खंडित; युध्दपातळीवर काम केल्यावर पुन्हा सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 19:34 IST

कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून अत्यावश्यक सेवा असणाऱ्या रूग्णालये, पाणीपुरवठा, ऑक्सीजन प्रकल्प, रेल्वेसेवा, विमानसेवा या क्षेत्रात मात्र वीजपुरवठा सुरळीत ठेवला होता

पुणे : दाट धुक्यामुळे महापारेषणच्या वाहिन्यांत तांत्रिक बिघाड होऊन पुणे व परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. दाट धुक्यामुळे ४०० के. व्ही. चाकण व ४०० के. व्ही. लोणीकंद या पुण्यातील मुख्य ग्रहणकेंद्राकडे येणारा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे अन्य ४०० के. व्ही. तसेच २२० के. व्ही. वाहिन्या बंद होऊ नयेत म्हणून पुणे शहर, बारामती, चाकण व औद्योगिक क्षेत्रामध्ये भारनियमन करावे लागले. दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून अत्यावश्यक सेवा असणाऱ्या रूग्णालये, पाणीपुरवठा, ऑक्सीजन प्रकल्प, रेल्वेसेवा, विमानसेवा या क्षेत्रात मात्र वीजपुरवठा सुरळीत ठेवला होता. महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर केल्यावर पुन्हा सुरळीत झाला. 

 दाट धुक्यांमुळे वीजपुरवठा खंडित 

महापारेषणच्या पुणे विभागातील महत्त्वाच्या ४०० के. व्ही. पारेषण वाहिन्यांपैकी ४०० के. व्ही. तळेगाव-चाकण, ४०० के. व्ही. लोणीकंद-चाकण, ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत१, ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत २ व ४०० के. व्ही. लोणीकंद-कराड या वाहिन्यांमध्ये दाट धुक्यांमुळे इन्सुलेटर डिकॅपिंग होऊन वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, या वाहिन्यांची महापारेषणकडून नियमितपणे देखभाल केली जाते. तळेगाव-लोणीकंद-चाकण या परिसरात दाट धुक्यामुळे वीजवाहिन्या बंद पडल्या. त्यानंतर स्वयंचलित ऍटो रिक्लोजर वाहिन्या सुरू होण्याच्या प्रयत्नात वेगवेगळ्या ठिकाणी वाहिन्या बंद झाल्या. यामुळे ४०० के. व्ही. चाकणचा विद्युतपुरवठा खंडित झाला. तसेच लोणीकंद-१ व लोणीकंद-२ निगडित तीन ४०० के. व्ही. वाहिन्या बंद पडल्यामुळे तसेच उर्वरित ४०० के. व्ही. वाहिन्यांवर लोड वाढल्यामुळे वेळेत लोड नियंत्रित करणे क्रमप्राप्त झाल्यामुळे पुणे शहर, बारामती, सुपा, आळेफाटा या परिसरात भारनियमन करण्यात आले.

वीजपुरवठा टप्प्याटप्पाने सुरु झाला 

परिणामी सकाळी सहा वाजल्यापासून १००० ते ११०० मेगावॅट भारनियमन करावे लागले. ४०० के. व्ही. कोयना-लोणीकंद वाहिनीव्दारे कोयना विद्युत निर्मिती केंद्राकडून साधारणतः १००० मेगावॅट अतिरिक्त वीज मिळाल्यानंतर सकाळी दहाला पुणे शहर व औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा टप्प्याटप्पाने चालू करण्यात आला. ४०० के. व्ही. तळेगाव-चाकण व ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत १ या वाहिन्या तात्काळ पूर्ववत करण्यात आल्या. दुपारपर्यंत सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत व पूर्ववत करण्यात आला.    घटनाक्रम

१) ४०० के. व्ही. तळेगाव-चाकण लाईन पहाटे ३.३९ ला बंद पडली.२) ४०० के. व्ही. चाकण-लोणीकंद लाईन पहाटे ४.३१ ला बंद पडली.३) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-१ लाईन पहाटे ५.५२ ला बंद पडली.४) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-२ लाईन पहाटे ५.२४ ला बंद पडली.५) ४०० के. व्ही. लोणीकंद-कराड लाईन सकाळी ६.०२ ला बंद पडली. ६) ४०० के. व्ही. तळेगाव-चाकण दुपारी १२.०४ मिनिटांनी सुरू करण्यात आली.७) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-१ दुपारी २.५७ सुरू करण्यात आली.८) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-२ दुपारी ३.४२ ला सुरू करण्यात आली.९) उर्वरित ३ वाहिन्या संध्याकाळी पाच वाजेपर्यत पूर्ववत करण्यात आल्या

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणelectricityवीजEmployeeकर्मचारी