कंपनीत घरफोडी चोरी करणारे ४ चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:32+5:302021-07-07T04:12:32+5:30

याप्रकरणी फिरोज रशीद पठाण (वय ४६ वर्ष, आर्दशनगर, भोसरी), श्रीकृष्ण भगावान वानखिडे (वय ३५ वर्ष, रा. टायगर कॉलनी, मोशी, ...

4 burglars arrested for burglary in the company | कंपनीत घरफोडी चोरी करणारे ४ चोरटे जेरबंद

कंपनीत घरफोडी चोरी करणारे ४ चोरटे जेरबंद

याप्रकरणी फिरोज रशीद पठाण (वय ४६ वर्ष, आर्दशनगर, भोसरी), श्रीकृष्ण भगावान वानखिडे (वय ३५ वर्ष, रा. टायगर कॉलनी, मोशी, ता. हवेली), सयारंगधर अशोक वानखिडे (वय २५ वर्ष), अजिम युनुस शेख (वय ३९ वर्ष) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका एंटरप्रायजेस ही कंपनी खराबवाडी गावच्या हद्दीत असून, मध्यरात्री संबंधित चोरट्यांनी कंपाउंड कापून कंपनीत प्रवेश करत लाखो रुपयांच्या स्पेअर पार्टवर हात मारला होता. याप्रकरणी चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हाळुंगे पोलिसांनी अधिक तपास करत असताना, परिसरातील कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, चोरट्यांनी कंपनीतील स्पेअर पार्टची वाहतूक करण्यासाठी चारचाकी पिकअप गाडीचा वापर केल्याचे दिसून आले. पंरतु त्यांचा नंबर समजून आला नाही. त्याबाबत शोध घेत असताना एमआयडीसीमध्ये एक पिकअपमधून काही लोक संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना हटकताच ते पळून जाऊ लागल्याने त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना (दि. ०२) रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता असून, त्यांची (दि. ७) पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. त्यांचेकडून १,२०,२८० रुपये किमतीचे फोरव्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट (मफलर गार्ड, ओल्ड बार, स्क्वेअर प्लेट) तसेच गुन्ह्यात वापरलेली ४ लाख रुपयांची एक पिकअप नंबर (एमएच १४ जीडी ९२५३) जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस अधिक तपास करीत आहे.

दरोड्यातील आरोपींसह म्हाळुंगे पोलीस.

Web Title: 4 burglars arrested for burglary in the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.