शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कंटेनरच्या धडकेत ४ म्हशींचा मृत्यू; मुंबई- बेंगळरु महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 01:39 IST

या अपघातांनंतर कंटेनरही उलटला..

ठळक मुद्देभारती विद्यापीठ पोलिसांनी कंटनेर चालकाला घेतले ताब्यात

पुणे : मुंबई -बेंगळरू बाह्य वळण महामार्गावरील दरी पुलावर भरधाव कंटेनरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ४ म्हशींचा मृत्यु झाला. अपघातानंतर कंटेनर उलटला.ही घटना दरी पुलावर गुरुवारी सायंकाळी घडली.

जांभुळवाडी भागातील रहिवासी ज्ञानोबा पंढरीनाथ जांभळे यांच्या मालकीच्या या ४ म्हशी होत्या. दरी पुलापासून काही अंतरावर त्या सायंकाळी चरण्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या गोठ्याकडे परत येत होत्या.त्याचवेळी नवीन कात्रज बोगद्याकडून पुण्याकडे भरधाव वेगाने एक कंटेनर येत होता. ३ म्हशींना धडक देऊन कंटेनर पुढे गेला. त्यावेळी मागील बाजूच्या चाकात एक म्हैस अडकली. त्यामुळे कंटनेरने बरेच अंतर या म्हशीला फरफटत नेले. त्यानंतर तो उलटला. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड वाहतूक विभागचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने अवजड कंटेनर पूर्ववत केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी कंटनेर चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे या महामार्गावर सायंकाळच्यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिस