शिरूर तालुक्यातील १५ गावांत ३८ कोरोनाबाधित रुग्ण, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:18 IST2021-02-18T04:18:10+5:302021-02-18T04:18:10+5:30

शिरूर तालुक्यात कोरोनाबाधित यांचा एकूण आकडा ६५७० एवढा झाला असून, ६०७३ कोरोनाबाधित यांनी कोरोनावर मात केली आहे, तर १६९ ...

38 coronavirus patients in 15 villages of Shirur taluka, one died | शिरूर तालुक्यातील १५ गावांत ३८ कोरोनाबाधित रुग्ण, एकाचा मृत्यू

शिरूर तालुक्यातील १५ गावांत ३८ कोरोनाबाधित रुग्ण, एकाचा मृत्यू

शिरूर तालुक्यात कोरोनाबाधित यांचा एकूण आकडा ६५७० एवढा झाला असून, ६०७३ कोरोनाबाधित यांनी कोरोनावर मात केली आहे, तर १६९ जणांचा मृत्यू झाला आहे. ३२८ जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिरूर तालुक्यात आज तालुक्यात आज शिरूर शहर १३, शिक्रापूर ८, विठ्ठलवाडी १, रांजणगाव गणपती १, मांडवगण फराटा १, कवठे यमाई १, जातेगाव खू.१, पिंपळसुटी १, न्हावरे १,रांजणगाव सांडस २,शिरूर ग्रामीण ३,सरद् वाडी १, निमगाव भोगी १,करडे २, तळेगाव ढमढेरे १ असे तालुक्यातील १५ गावांत ३८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला.

शिरूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आकडा कमी-जास्त होत असून, नागरिकांनी गाफील राहू नये, कोरोनाबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी नेहमी तोंडाला मास्क लावणे, गर्दी करू नये गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टन्स पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.

Web Title: 38 coronavirus patients in 15 villages of Shirur taluka, one died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.