शिरूर तालुक्यामधील ३८ जणांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST2020-12-26T04:09:06+5:302020-12-26T04:09:06+5:30

शिरूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल आता वाजले असून, २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून काल उमेदवारी अर्ज ...

38 candidates from Shirur taluka filed nomination papers | शिरूर तालुक्यामधील ३८ जणांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

शिरूर तालुक्यामधील ३८ जणांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

शिरूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल आता वाजले असून, २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ३ उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी ३५ असे एकूण ग्रामपंचायती मिळून ३८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आपापल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अधिकाऱ्याकडे सादर केले आहे.

गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायत तहसीलदार यांच्याकडे थकबाकी भरण्यासाठी तर आपल्या गावातील निवडणूक अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज कसा वाढायचा त्यात काय काय त्रुटी आहेत याबाबत विचारणा करण्यासाठी इच्छुकांची रांग लागलेली दिसून येत होती.

तर शिरूर शहरातील सायबर कॅफे नोटरी करणारे वकील यांच्याकडे उमेदवारी या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील चांडोह १,खंडाळे १७, भांबर्डे १,शिक्रापूर ३,तळेगाव ढमढेरे ४, मुखई १,गोलेगाव ४,करंदी १, निमोने १,कारेगाव २,कोरेगाव भीमा ३ असे शिरूर तालुक्यातील 11 गावात 38 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: 38 candidates from Shirur taluka filed nomination papers