शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन मुस्कान : ३७ अल्पवयीन मुलांना पालकांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 16:04 IST

उत्तर प्रदेशातून त्या दोन अल्पवयीन मुली दोघा मुलांबरोबर पळून आल्या होत्या़. त्यांनी घरच्यांना आपला पत्ता लागू नये, म्हणून मोबाईलमधील कार्डही बदलले़ पण, त्यावरुन त्यांनी नकळत एक कॉल केला होता़.

ठळक मुद्देकेवळ एका कॉलवरुन दोन अल्पवयीन मुलींचा लावला शोधऑपरेशन मुस्कान : ३७ अल्पवयीन मुलांना पालकांच्या ताब्यात

पुणे : उत्तर प्रदेशातून त्या दोन अल्पवयीन मुली दोघा मुलांबरोबर पळून आल्या होत्या़. त्यांनी घरच्यांना आपला पत्ता लागू नये, म्हणून मोबाईलमधील कार्डही बदलले़ पण, त्यावरुन त्यांनी नकळत एक कॉल केला होता़. या एकुलत्या एक कॉलच्या धाग्यावरुन सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले़ . ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत डिसेंबर महिन्यात १५ अल्पवयीन मुले व २० अल्पवयीन मुली व २ सज्ञान मुली अशा ३७ मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले़.                   याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातून पळून आलेल्या या दोन मुलींच्या शोधासाठी अन्य १० जणांची चौकशी करण्यात आली़. त्यांच्याविषयी काहीही माहिती नसताना केवळ एका फोन कॉलवरुन त्यांचा शोध घेण्यात यश मिळाले़. ते १५ दिवस पुण्यात मुलांच्या ओळखीच्या नातेवाईकांकडे रहात होते़. ही दोन्ही मुले बांधकाम व्यवसायात कामाला लागणार होती. पश्चिम बंगालमधून असाच एक अल्पवयीन मुलगा घरातून निघून पुण्यात आला होता़. तसेच गुजरातमधून बारामतीला नातेवाईकांकडे एक अल्पवयीन मुलगा आला होता़ पुन्हा घरी जातो, असे सांगून तो बारामतीहून निघाला व चुकला होता़.  त्याला रिमांड होममध्ये ठेवण्यात आले होते़.  त्याच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले़.                ऑपरेशन मुस्कानअंतर्गत हरविलेल्या बालकांचा शोध घेण्याबरोबरच सापडलेल्या बालकांची ओळख निष्पन्न करुन त्यांच्या पालकांचा शोध घेऊन बालक व त्यांचे पालक यांचे पुनर्मिलन घडवून आणण्याची ही कामगिरी केले जाते. ही कामगिरी करण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक अनिता खेडकर, उपनिरीक्षक अनंत व्यवहारे, सहायक फौजदार नामदेव शेलार, हवालदार प्रमोद म्हेत्रे, राजाराम घोगरे, नितिन तेलंगे, सचिन कदम, सुनिल वलसाने, रमेश लोहकरे, राजेंद्र कचरे, प्रदीप शेलार, तुषार आल्हाट, निलेश पालवे, संदीप गायकवाड, अनुराधा धुमाळ, ननिता येळे, कविता नलावडे, गितांजली जाधव, रुपाली चांदगुडे यांचा समावेश आहे़. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस