शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी ३७ लाखांचा खर्च; पुणे महापालिकेच्यावतीने पहिल्यांदाच स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:28 IST

महापालिकेच्या वतीने महापौर चषक स्पर्धेअतंर्गत यंदा पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजिण्यात आली. परंतू या खर्चाला मान्यता घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवत सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळी प्रस्ताव दाखल केला.

ठळक मुद्देयंदाच्या वर्षी महापौर चषक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धेचा समावेशस्पर्धेसाठी होणाऱ्या खर्चाची माहिती जिल्हा संघटनेने १४ सप्टेंबरलाच दिली होती पालिकेला

पुणे : महापालिकेच्या वतीने महापौर चषक स्पर्धेअतंर्गत यंदा पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजिण्यात आली. यासाठी तब्बल ३७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी खर्च केला. परंतू या खर्चाला मान्यता घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवत सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळी प्रस्ताव दाखल केला.महापौर चषक स्पर्धेअंतर्गत दर वर्षी शहरात विविध स्पर्धा घेतल्या जातात. महापौर चषक स्पर्धांसाठी केल्या जाणाऱ्या खर्चावरून अनेकदा वादंगही निर्माण होतात. पालिकेत सत्ताधारी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) पदाधिकाऱ्यांनी यंदा याबाबत काहीही वाद निर्माण होणार नसल्याची ग्वाही दिली. मुक्ता टिळक, मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला होता. यंदाच्या वर्षी महापौर चषक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धेचा समावेश करण्यात आला होता. पालिकेच्या वतीने पहिल्यांदाच ही स्पर्धा घेतली जात असल्याने पालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी याचे आयोजन आपल्याकडे घेतले होते. या स्पर्धेसाठी होणाऱ्या खर्चाची माहिती जिल्हा संघटनेने १४ सप्टेंबरलाच पालिकेला दिली होती. तसेच ही स्पर्धा घेण्याबाबत महापौर कार्यालयाने २० डिसेंबरलाच पत्र दिलेले होते. 

महापालिका : आयत्यावेळी प्रस्ताव दाखल करून मान्यतामहापौर चषक स्पर्धा घेण्याचे जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच शरीरसौष्ठव स्पर्धेला झुकते माप दिले होते. महापौर चषक स्पर्धांमध्ये कोणत्या खेळांचा समावेश असणार आहे, याची माहिती देण्यासाठी महापौर टिळक यांनी पालिकेत पत्रकार परिषद बोलाविण्यापूर्वीच शहरातील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये फक्त शरीरसौष्ठव स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMukta Tilakमुक्ता टिळकShrinath Bhimaleश्रीनाथ भिमाले