शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

Divorce Case: जोडप्यांमध्ये ‘तुझ माझं जमेना’; वर्षभरात घटस्फोटाचे ३६७ दावे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 17:52 IST

काही वर्षात जोडप्यांमध्ये ‘तुझ माझं जमेना’ म्हणत विभक्त होण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलले जात आहे

नम्रता फडणीस

पुणे : गेल्या काही वर्षात जोडप्यांमध्ये ‘तुझ माझं जमेना’ म्हणत विभक्त होण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलले जात आहे. एकमेकांशी क्षुल्लक कारणांवरून खटके उडण्याबरोबरच वादविवाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना काळापासून जोडप्यांच्या तक्रारी आणि भांडणात अधिकच भर पडली आहे. 2020 मध्ये कौटुंबिक न्यायालयात ‘साधता संवाद मिटतो वाद’ या ब्रीदवाक्यांतर्गत सुरू केलेल्या ‘चला बोलू या’ या वादपूर्व समुपदेशन केंद्राकडे तडजोडीसाठी 209 दावे दाखल झाले  होते.  2021 मध्ये या दाव्यांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षाअखेर केंद्राकडे दाखल झालेल्या 367  दाव्यांपैकी  80 दावे तडजोड करून निकाली काढण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्राकडे 2018 ते 31 जानेवारी 2022 याकालावधीत 1026 दावे दाखल झाले असून, त्यापैकी केवळ 198 दावेच निकाली काढण्यात केंद्राला यश मिळाले आहे.     एकमेकांमधील अहंकार, क्षुल्लक कारणांवरून वादविवाद यांसह कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ऑफिसमधले विवाहसंबंध एकमेकांसमोर खुले होणे, सासू-सास-यांबददलच्या तक्रारी, मुलीच्या आईवडिलांचा अतिरिक्त हस्तक्षेप..माहेरच्यांशी पत्नीने जास्त बोलू नये अशा किरकोळ कारणांसाठी घटस्फोट घेण्याकरिता अर्जांचे प्रमाण वाढत आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ‘चला बोलू या’ हा उपक्रम 2018 पासून कौटुंबिक न्यायालयात येणा-या दाव्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. या केंद्रात पती-पत्नींमधील वादविवाद, पोटगीसंबंधीचे वाद, मुलांच्या ताब्याचे वाद, मालमत्तेचे वाद याव्यतिरिक्त आई-वडील, मुले यांच्यातील पोटगी किंवा सांभाळ करण्याबाबतचे वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. दाखल प्रकरणांमध्ये तडजोड न झाल्यास उभय पक्षकरांना विधी सेवा दिली जाते. यामध्ये तडजोड न झालेल्या दाव्यांचे प्रमाणही अधिक आहे.

सद्यस्थितीत केंद्रामध्ये नऊ समुपदेशक आणि 7 वकिलांचे पँनेल कार्यरत आहे. प्रमुख पालक कौंटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश मनीषा काळे या केंद्रप्रमुख म्हणून काम पाहातात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे आणि प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत हे या केंद्राचे प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच कौंटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांचे वेळोवेळीमार्गदर्शन लाभते. प्राधिकरणाचे कर्मचारी महेंद्र साळुंके यांच्याकडे या केंद्राची जबाबदारी आहे. ''कोरोनाच्या लॉकडाऊन काळात न्यायालयाचे कामकाज बंद होते आणि नंतर कोरोना नियमावलीनुसार कामकाज सुरू होते. जी जोडपी बाहेरगावची होती, ती येऊ शकत नव्हती. यातच एकतर्फी बाजूने घटस्फोट हवा असेल तर पुढे जाता येत नाही. त्यामुळे प्रलंबित दाव्यांची संख्या वाढली आहे. आता कोरोनाचे निर्बंध उठले आहेत त्यामुळे प्रलंबित दाव्यांची संख्या कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत असे प्रतापसावंत (सचिव पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) यांनी सांगितले.'' 

टॅग्स :PuneपुणेDivorceघटस्फोटCourtन्यायालयmarriageलग्न