शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कसब्यातील ३६ टक्के OBC समाज 'मविआ' च्या पाठीशी उभा राहणार; विजय वडेट्टीवारांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 13:56 IST

असंविधानिक मार्गाने सत्तेवर आलेल्या शिंदे व भाजप सरकारने अडथळा निर्माण करून ओबीसींना दूर ढकलल्याची भावना सर्वत्र पसरली

पुणे : राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत असूनही या मंडळींनी ओबीसींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कसब्यातील ३६ टक्के ओबीसी समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास काँग्रेसचे नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे व्यक्त केला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी वडेट्टीवार पुण्यात आले असता काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी खात्याचा मंत्री म्हणून आपण ओबीसी बांधवांसाठी वर्ग तीन, वर्ग चारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, घरकुल, विद्यार्थ्यांना वसतिगृह, स्वाधार योजना तसेच महाज्योती संस्था आदी कामांचा पायाभूत आराखडा निश्चित केला होता. असंविधानिक मार्गाने सत्तेवर आलेल्या शिंदे व भाजप सरकारने अडथळा निर्माण करून ओबीसींना दूर ढकलल्याची भावना सर्वत्र पसरली आहे.राज्यात मंत्रिमंडळ पूर्ण अस्तित्वात आले नसून, केवळ आमदार पोसण्याचे काम सुरु आहे. या मंडळींना विकास व सामान्य माणूस दिसत नाही. जात व धर्मात भांडणे लावायची एवढाच उद्योग त्यांनी सुरु ठेवला आहे. पायाखालची वाळू सरकल्याने भाजपच्या मंडळींनी बेताल वक्तव्ये सुरु केली आहे. सोशल मीडियात शिव्या खाण्याच्या प्रकारावरून ते किती अस्वस्थ झाले आहेत हे ध्यानात येते, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBCअन्य मागासवर्गीय जातीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूकBJPभाजपा