शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'गप्प बस' धमकवून फिल्मीस्टाईल दरोड्यात लुटले ३३ तोळे सोने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 21:06 IST

माहेरी आलेल्या महिलेला धमकवून मारहाण करत फिल्मीस्टाईल दरोड्याची घटना पुण्यातील अवसरी बुद्रुक येथे घडली आहे.

ठळक मुद्देअवसरीच्या दरोड्यात ३३ टोळ्यांचा ऐवज लांबवलाघरात झोपलेल्या बहिणीला धमकवून, मारहाण करून फिल्मीस्टाईल दरोडा 

पुणे (अवसरी) :माहेरी आलेल्या महिलेला धमकवून मारहाण करत फिल्मीस्टाईल दरोड्याची घटना पुण्यातील अवसरी बुद्रुक येथे घडली आहे. या दरोड्यात माहेरवाशीण असलेल्या रुपाली काळे यांना डोके दाबून, धमकावून तब्बल ३३ तोळे सोन आणि १० हजार रुपये रोख असा सुमारे सात लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला आहे .

 अवसरी बुद्रुक येथे संभाजी हिंगे कुटुंबियांसह राहतात. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे त्यांचे वडील रामदास हे घराच्या ओट्यावर तर स्वतः संभाजी पत्नी सुनीता आणि मुलगा हर्षवर्धनसह गच्चीवर झोपले होते. घरात फक्त त्यांची विवाहित बहिण रुपाली काळे या झोपल्या होत्या. अचानक रात्री दीडच्या सुमारास काही दरोडेखोर पहारीच्या सहाय्याने मागील घराचा दरवाजाचा कडीकोयंडा उचकटुन, घरात शिरून वस्तूंची उचकपाचक करत होते. त्यावेळी जाग आलेल्या रुपाली यांना बघताच त्यांनी त्यांचे पाय दाबून, डोके पकडून मारहाण केली. त्यांना गप्प बस अशी धमकीही दिली. हा सर्व प्रकार सुरु असताना प्रतिकार करत रुपाली ओरडल्या आणि भाऊ संभाजी यांना जाग आली. एवढ्या रात्री काय झाले हे बघण्यासाठी ते घरात आले असता गच्चीवरून त्यांना एक लाल शर्ट घातलेला इसम पळताना अंधारात दिसला. 

       घरात जाऊन बघितले असते संपूर्ण घर अस्ताव्यस्त झालेले दिसून आले. यावेळी घरातील चोरटयांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी चोरट्यांनी संपूर्ण घर धुवून नेले होते . रूपाली यांचे १० दहा तोळे सोन्याची पट्टी असलेले २ लाख ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र, ७५ हजार रुपये किमतीचे तीन तोळयाचा राणी हार,२५ हजार किमतीचे एक तोळयाचा मोठा मणी, १ लाख १२ हजार रुपये किमतीचे साडेचार तोळ्याचे नेकलेस,२५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी ,७५ हजार रुपये तीन तोळयाच्या सोन्याच्या बांगड्या,२५ हजार रुपये किमतीची एक तोळ्याची कर्णफुले,सुनीता हिंगे यांच्या तीन तोळयाचे मणी मंगळसूत्र ,३ तोळ्याचे नेकलेस ,संभाजी हिंगे यांची अंगठी १५ हजार रूपयांची ,७ हजार रूपयांची रोख रोकड,२२ हजार ५०० रूपयांची सोन्याची चैन,रामदास हिंगे यांच्या खिशातील १५०० रूपयांचे रोकड असा एकुण  ७ लाख ३२ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याचे संभाजी हिंगे यांनी पोलिसात दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरRobberyदरोडाGoldसोनं