३०० रूपयांची लाच मागणा-या वाहतूक पोलिसाला अटक

By Admin | Updated: May 7, 2014 01:44 IST2014-05-06T20:44:09+5:302014-05-07T01:44:02+5:30

कात्रज ते शिरवळ अशी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनाचालकाकडे दरमहा ३०० रूपयांच्या हप्ताची मागणी करणार्‍या वाहतूक पोलीसाला लाच लुचपत प्रतिबंधक अधिकार्‍यांनी अटक केली.

300 rupees for bribe, traffic police arrested | ३०० रूपयांची लाच मागणा-या वाहतूक पोलिसाला अटक

३०० रूपयांची लाच मागणा-या वाहतूक पोलिसाला अटक

पुणे : कात्रज ते शिरवळ अशी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनाचालकाकडे दरमहा ३०० रूपयांच्या हप्ताची मागणी करणार्‍या वाहतूक पोलीसाला लाच लुचपत प्रतिबंधक अधिकार्‍यांनी अटक केली. सुरेश तुकाराम मोरे असे त्या वाहतूक पोलीसाचे नाव आहे.
कात्रज ते शिरवळ या मार्गावर प्रवासी वाहतूक करताना कारवाई न करण्यासाठी मोरे दरमहा तीनशे रूपयांचा हप्ता वाहनचालकांकडे मागत होते. लाच लुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी याप्रकरणाची पडताळणी करून मोरे यांना अटक केली आहे. त्यांच्याविरूध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 300 rupees for bribe, traffic police arrested