शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक

By भाग्यश्री गिलडा | Updated: March 17, 2024 15:03 IST

बँकेचे नाव सांगून फसवणूक केल्याच्या २ तक्रारी एकाच दिवसात आल्या आहेत

पुणे: अनधिकृत मार्गाने बँकेची माहिती चोरी करून तसेच बँकेतून बोलत असल्याचे सांगून फसवणूक केल्याच्या २ तक्रारी एकाच दिवसात आल्या आहेत. याप्रकरणी सहकारनगर आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात शणैवारी (दि. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेमध्ये, धनकवडी परिसरात राहणाऱ्या गौतम प्रदीप बडवे (३५) यांनी फिर्याद दिली आहे. बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुम्ही क्रेडिट कार्ड वापरात नसल्याने अतिरिक्त दंड भरावा लागेल सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. क्रेडिट कार्डवरील दंड भरण्यासाठी तगादा लावून तक्रारदार यांना एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्याद्वारे रिमोट ऍक्सेस मिळवून, बँक खात्याची खासगी माहिती चोरून तक्रारदार यांच्या बँक खात्यातून तब्बल २८ लाख २७ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत जबाब नोंदवला. 

दुसऱ्या घटनेमध्ये, वाघोली परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बँकेतून बोलत असल्याचे सांगून महिलेकडून त्यांच्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स घेतले. त्यानंतर एक लिंक पाठवून महिलेला त्यावर क्लिक करण्यास सांगितले. त्याद्वारे फिर्यादी महिलेच्या मोबाईलचा ताबा मिळवून त्यांच्या क्रेडिट कार्डवरून २ लाख ५० हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेतले.  रुपये उकलण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डाची गोपनीय माहिती अनधिकृत मार्गाने मिळवून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे. याप्रकरणी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेbankबँकfraudधोकेबाजीSocialसामाजिकMONEYपैसाcyber crimeसायबर क्राइम