शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : भीक मागण्यासाठी ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण; श्रीगाेंदा येथून महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 20:29 IST

कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी

पुणे : भीक मागण्यासाठी आणि लग्नात हुंडा मिळविण्याच्या आशेने ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिला श्रीगोंदा येथे घेऊन जाणाऱ्या महिलेला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक करुन मुलीची सुखरुप सुटका केली. तब्बल ५ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

उषा नामदेव चव्हाण (वय ४०, रा. कापसे वस्ती, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे या महिलेचे नाव आहे.याबाबत माहिती अशी, एक २३ वर्षाची महिला फुगे विकत असते. ती २३ मे रोजी दुपारी दीड वाजता ढोले पाटील रोडवरील एका रिक्षात झोपली होती. त्यावेळी तिच्या ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. तिने दोन दिवस तिचा शोध घेतल्यानंतर २५ मे रोजी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सहायक निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी महिला अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. तब्बल ५ दिवसांनी श्रीगोंदा येथून उषा चव्हाण हिला पकडण्यात आले.

उषा चव्हाण हिला दोन मुले व दोन मुली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लग्नात तिने ३० हजार रुपये हुंडा घेतला होता. त्यांचे समाजामध्ये मुलीचे लग्न करताना मुलाच्या वडिलांकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे. या कारणासाठी ती लहान मुलीला पळवून नेऊन तिला भिक्षा मागण्यासाठी लावणे तसेच तिचे लग्न करताना हुंडा घेता यावा, यासाठी पळवून आणले होते. ही महिला पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त एन. ए. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेता, सहायक निरीक्षक दीपाली भुजबळ, प्रेरणा कुलकर्णी, उपनिरीक्षक अमोल घोडके, सहायक फौजदार दिनेश शिंदे, नामदेव खिलारे, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बालाजी घोडके, संदीप जढर, विशाल गाडे, अझरुद्दीन पठाण, ज्योती राऊत यांनी केली.

१५० सीसीटीव्ही तपासातून मिळाला धागा

ढोले पाटील रोडवरून ज्या ठिकाणाहून या मुलीचे अपहरण केले गेले, तेथे ही महिला दिसली नाही. त्यामुळे पाटील इस्टेट, रेल्वे स्टेशन, मालधक्का, एस टी स्टॅड परिसरातील १५० सीसीटीव्हीमध्ये शोध घेतला. त्यात एका ठिकाणी ती धुसर दिसून आली. या धाग्यावरुन तिला पकडले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी