Corona Virus In Pune City: शहरात नवे ३ हजार ६७ कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 21:32 IST2022-01-10T21:32:26+5:302022-01-10T21:32:38+5:30
विविध प्रयोगशाळांमध्ये सोमवारी १५ हजार १३९ जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली

Corona Virus In Pune City: शहरात नवे ३ हजार ६७ कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू
पुणे : शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये सोमवारी १५ हजार १३९ जणांची कोरोनाची चाचणी (corona test) करण्यात आली. यापैकी ३ हजार ६७ जण बाधित असल्याचे आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी २० ते २५ टक्के इतकी झाली आहे. रविवारी ४०२९ नवे बाधित आढळले होते, आज एक हजार कमी आढळून आले.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ९८ इतकी झाली असून, विविध रुग्णालयांत यापैकी केवळ ५.१० टक्के रुग्ण दाखल आहेत. यामध्ये १४३ जण ऑक्सिजनसह, १७ जण व्हेंटिलेटरवर व १७ जण आयसीयूमध्ये आहेत. आज दिवसभरात (two death) दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ८५७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
शहरात आतापर्यंत ३९ लाख ९२ हजार ५२० जणांनी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी ५ लाख २९ हजार १०२ जण बाधित आढळून आले. तर यापैकी ५ लाख २ हजार ८७५ जण कोरोनामुक्त झाले असून, ९ हजार १२९ जणांचा मृत्यू झाला आहे.