शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

फेरफार अदालतीत एकाच दिवसात ३ हजार २६९ नोंदी निकाली; ६ महिन्यांत १ लाख ५५ हजार नोंदी पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 20:01 IST

सहा महिन्यांत १ लाख ५५ हजार नोंदी केल्या पूर्ण 

ठळक मुद्देफेरफार अदालतीमधुन नोंदी निर्गतीचे काम आणखी दोन दिवस सुरु राहणार

पुणे :  पुणे जिल्हयात कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे फेरफार अदालतीचे काम मार्चपासून बंद होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार चार महिन्यानंतर बुधवार (दि.28) रोजी फेरफार अदालत घेण्यात आली. या फेरफार अदालतीत जिल्ह्यात एका दिवसात ३ हजार २६९ नोंदी निकाली करण्यात आल्या. फेरफार अदालतीमधुन नोंदी निर्गतीचे काम आणखी दोन दिवस सुरु राहणार असून,  यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.

नोंदी निर्गतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ऑक्टोबर २०२० पासून प्रत्येक मंडळाला संपर्क अधिकारी नेमण्याचे नियोजन करण्यात आले. नोंदी निर्गतीसोबत सातबारा संगणकीकरणामध्ये देखील पुणे जिल्हा प्रगतीपथावर आहे व ऑगस्ट अखेर संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुणे जिल्हयात १ फेब्रुवारी २०१९ ते ३० जुन २०२९ अखेर ३१ लाख १२ हजार ५२५ सातबारा उतारे, १० लाख ३५ हजार ३१६ आठ अ उतारे व ३ लाख २७ हजार ६७८ फेरफार उतारे नागरिकांना ऑनलाईन वितरीत करणेत आले आहेत. तसेच माहे जानेवारी २०२१ ते जुन २०२१ अखेर ८ लाख ७६ हजार ८३२ सातबारा उतारे, ४ लाख ९ हजार २८२ आठ अ उतारे व १ लाख ३२ हजार २५० फेरफार उतारे ऑनलाईन वितरीत करणेत आले आहेत. त्यापोटी रक्कम रु. २ कोटी ५० लाख ८५ हजार २५५/- इतका महसूल जमा झाला आहे. पुणे जिल्हा राज्यात ७/१२, ८ अ व फेरफार वितरणामध्ये तिस-या क्रमांकावर आहे.------तालुकानिहाय फेरफार नोंदी निर्गतहवेली ३१६, पुणे शहर ५, पिंपरी चिंचवड १४५, शिरुर ४०८, आंबेगाव १६९, जुन्नर १७३, बारामती ४५२, इंदापूर ३१४, मावळ २३८, मुळशी ७१, भोर १०७, वेल्हा १३२, दौंड १९३, पुरंदर १५३, खेड ३९३ अशा एकूण ३ हजार २६९ अशी आहे.  फेरफार नोंदी निर्गतीचे काम पुर्ण करण्यात आले.-------जानेवारी ते जुलै या कालावधी मध्ये १ लाख ५५ हजार ४३३ फेरफार नोंदी नव्याने घेण्यात आल्या असून, १ लाख ५५ हजार ४२२ फेरफार नोंदी निर्गत देखील करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा फेरफार नोंदी धरुन घेणेच्या बाबतीत राज्यात दुस-या क्रमांकावर असून,  ९ लाख २३ हजार ९१७ फेरफार नोंदी घरलेल्या आहेत व त्यापैकी ८ लाख ९७ हजार ६६० (नामंजुरसह) फेरफार नोंदी निर्गत करणेत आल्या आहेत. फेरफार निर्गतीचे प्रमाण अधिक वाढवणेकामी महिन्यातून दोनदा फेरफार अदालती घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत, यामुळे नागरिकांच्या फेरफार नोंदी तात्काळ निर्गत करण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड