शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीआय कार्यकर्ते शिरसाट खूनप्रकरणी तिघांना कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 00:56 IST

भारती विद्यापीठ पोलीस : आरोपींनी कुणाच्या सांगण्यावरून केला खून याचा होणार तपास

पुणे : रिपब्लिकन बांधकाम कामगार सेनेचे उपाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या खूनप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.

धरमप्रकाश कर्ताराम वर्मा (वय ३८, रा. शिवणे, मूळ रा. उत्तर प्रदेश), महंमद फारूख इसहका खान (वय २८, रा. उत्तमनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश), मुक्तारअली मसीहुद्दीन अली (वय ३४, रा. आंबेगाव, मूळ रा. मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या तीन जणांची नावे आहेत. विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२, रा. शिवणे) असे खून झालेल्यांचे नाव आहे. याबाबत त्यांचे वडील सुधाकर कोंडिबा शिरसाट (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. ३० जानेवारी २०१९ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी पोलिसांनी वर्मा, खान, अली यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता वर्मा हा पीओपीचा व्यवसायकरतो. पीओपीच्या पैशांच्या देवाण- घेवाणीवरून विनायक आणि वर्मा यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यानंतर विनायक यांनी वर्माला शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरून त्याने इतर दोन साथीदारांसह विनायक यांचे ३० जानेवारी रोजी अपहरण केले. त्या वेळी त्यांना मारहाण केली. आरोपींनी विनायक यांना कोणाच्या सांगण्यावरून मारले आहे का, अपहरण करून त्यांना कोठे नेले, त्यांचा खून कोठे करण्यात आला, त्यांना अन्य कोणी साथीदार आहे का, याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.विनायक हे ३१ तारखेपासून बेपत्ता होते. ते अनधिकृत बांधकामांविरोधात काम करीत असल्यामुळे कोणीतरी त्यांचे अपहरण केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुठा गावाजवळ असलेल्या घाटामध्ये सापडला होता. धरमप्रकाश वर्मा व महंमद खान यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुठागावाच्या जवळील घाटात फेकून दिला. या प्रकरणी वर्मा, खान, अली यांना न्यायालयात हजर केले होते.

टॅग्स :ArrestअटकPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी