कुरिअर बॉयच्या बॅगेतून ३ लाखांचा ऐवज चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:46+5:302021-08-23T04:14:46+5:30
पुणे : कुरिअर बॉयने दुचाकीला अडकवून ठेवलेल्या बॅगेतून दुचाकीस्वार चोरट्यांनी २ लाख ८४ हजारांच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. ही ...

कुरिअर बॉयच्या बॅगेतून ३ लाखांचा ऐवज चोरीला
पुणे : कुरिअर बॉयने दुचाकीला अडकवून ठेवलेल्या बॅगेतून दुचाकीस्वार चोरट्यांनी २ लाख ८४ हजारांच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. ही घटना धायरीतील डीएसके विश्व परिसरात १९ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पांडवनगर येथे राहणाऱ्या एका ३१ वर्षांच्या तरुणाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण कुरिअर डिलिव्हरीचे काम करतो. १९ ऑगस्टला दुपारी तीनच्या सुमारास तो डिलिव्हरी देण्यासाठी डीएसके विश्व परिसरात गेला होता. त्या वेळी त्याने जवळील बॅग दुचाकीला अडकवून वस्तू ग्राहकाला देण्यासाठी इमारतीत गेला. त्याच वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी २ लाख ८४ हजार रुपयांच्या वस्तू असलेली बॅग चोरून नेली.
----------------------
तरुणाची सोनसाखळी हिसकाविली
पुणे : रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना दत्तवाडी येथील चैतन्य हाॅस्पिटलसमोरील रोडवर २० ऑगस्ट रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
मुकुंदनगर येथे राहणाऱ्या एका २८ वर्षांच्या तरुणाने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करीत आहेत.