पुण्यातील बिबवेवाडी गावठाणात ३ चारचाकी गाड्यांची तोडफोड; २ गटातील वादाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 13:46 IST2018-01-01T13:44:20+5:302018-01-01T13:46:56+5:30

बिबवेवाडी गावठाणात गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांच्या चारचाकी गाड्यांची तोडफोड होऊन मोठे नुकसान झाले आहे. 

3 four-wheelers sabotage in Bibvewadi village in Pune; The result of the 2 group dispute | पुण्यातील बिबवेवाडी गावठाणात ३ चारचाकी गाड्यांची तोडफोड; २ गटातील वादाचा परिणाम

पुण्यातील बिबवेवाडी गावठाणात ३ चारचाकी गाड्यांची तोडफोड; २ गटातील वादाचा परिणाम

महर्षी नगर : बिबवेवाडी गावठाणात गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच वर्षाच्या शेवटी तरूणांच्या दोन गटांमधील वादामुळे रहिवाशांच्या चारचाकी गाड्यांची तोडफोड होऊन मोठे नुकसान झाले आहे. 
बिबवेवाडी गावठाणात रात्रीच्या वेळी तरूणवर्ग यामध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण जास्त आहे, असे तरूण मुलांचे गट गप्पा मारत असतात, त्यामुळे अनेकदा त्यांच्यात मारामारी होऊन वाद निर्माण होऊन त्यातूनच गटबाजी उफाळून हा सर्व प्रकार घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे बिबवेवाडी गावठाणातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी मोठी घटना घडण्याची वाट न बघता तत्काळ कारवाई करावी, अशी बिबवेवाडी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Web Title: 3 four-wheelers sabotage in Bibvewadi village in Pune; The result of the 2 group dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे