शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

बारामतीत सावकारांचे धाबे दणाणले; पोलिसांच्या भीतीने ३ कोटींची जमीन शेतकऱ्याला मिळाली परत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 21:30 IST

सावकारांना वाईट तर सर्वसामान्यांना आता अच्छे दिन आल्याचे मानले जात आहे.  

बारामती : बारामती शहरात पोलिसांच्या कडक कारवाईमुळे सावकारांना वाईट दिवस आले असून बडे सावकारांचे धाबे दणाणले आहेत. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या सावकाराने पोलिसांच्या भीतीमुळे ३ कोटीची जमीन कर्जदाराला परत केली आहे. याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ६० लाख रुपये किंमतीची जमीन सावकाराकडुन पोलिसांनी एका शेतकऱ्याला मिळवुन दिली होती. आजपर्यत ३ कोटी ६० लाखांची बळकावलेली जमीन परत मिळाल्याने शहरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सावकारांविरुध्द कडक मोहिम उघडली आहे. सावकारांना वाईट तर सर्वसामान्यांना आता अच्छे दिन आल्याचे मानले जात आहे. सावकार हा जळोची परिसरातील आहे. त्याने एका गरीब शेतकऱ्याला १० लाखांचे कर्ज देवुन दरमहा १० टक्के सावकारी व्याजापोटी जवळपास तीन कोटी रुपयांची दिड एकर जमीन लिहुन घेतली होती.

सावकारी व्याजदराने कर्ज घेतल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने महिना लाख रुपये याप्रमाणे अठरा महिने सावकाराच्या पैशाची परतफेड केली.त्यानंतर देखील या पुढारी सावकाराची भुक भागली नाही. तो शेतकऱ्याकडे आणखी पाच लाखांची मागणी करत होता. त्यासाठी त्याला बारामती बाजार समितीतील गाळा आपल्या नावाने लिहून देण्याचा तगादा सावकाराने लावला होता.परिणामी संबंधित शेतकरी घाबरला होता. पैसे दिले न दिल्यास शेतकऱ्याच्या जमिनीवर राजकीय वजन वापरुन आरक्षण टाकण्याची धमकी देखील सावकार देत होता.

दरम्यान, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सावकारांविरुध्द केलेले आवाहन सुदैवाने या शेतकऱ्यापर्यंत पोहचले. त्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेत आपबिती कथन केली. शिंदे यांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर शेतकऱ्याला मानसिक आधार दिला. तर सावकाराला बोलावणे पाठवले. त्यानंतर घाबरगुंडी उडालेल्या त्या सावकाराला कारवाईचा इशारा देत सरळ केले. त्यामुळे त्याने दीड एकराची संबंधित जमीन त्या शेतकऱ्याला पुन्हा त्याच्या नावे करुन दिली. 

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसFarmerशेतकरी