शंभराहून अधिक घरफोडी करणाऱ्याकडून ३ गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 04:00 IST2020-11-30T04:00:59+5:302020-11-30T04:00:59+5:30

पुणे : शंभराहून अधिक घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२, रा़ आंबेडकर वसाहत, औंध) ...

3 crimes uncovered by more than 100 burglars | शंभराहून अधिक घरफोडी करणाऱ्याकडून ३ गुन्हे उघडकीस

शंभराहून अधिक घरफोडी करणाऱ्याकडून ३ गुन्हे उघडकीस

पुणे : शंभराहून अधिक घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२, रा़ आंबेडकर वसाहत, औंध) याच्याकडून ३ गुन्हे उघडकीस आणण्यात चतु:श्रृंगी पोलिसांना यश आले आहे़

शासकीय तंत्रनिकेतन कर्मचारी वसाहत येथे जयवंत गायकवाड याने फेबु्रवारी २०२० मध्ये घरफोडी केल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे यांना मिळाली़ त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या सूचनेनुसार न्यायालयाच्या परवानगीने जयवंत गायकवाड याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले़ त्याच्याकडे केलेल्या तपासात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले़ त्याच्याकडून १५३ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ७ लाख २० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

Web Title: 3 crimes uncovered by more than 100 burglars