मंचर मध्ये २९ हजारांची देशी दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:12 IST2021-03-23T04:12:45+5:302021-03-23T04:12:45+5:30

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार धामणी गावच्या हद्दीत हॉटेल ...

29,000 worth of liquor seized in Manchar | मंचर मध्ये २९ हजारांची देशी दारु जप्त

मंचर मध्ये २९ हजारांची देशी दारु जप्त

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार धामणी गावच्या हद्दीत हॉटेल जय मल्हार येथे अमोल अंकुश जाधव व राहुल सुभाष जाधव (दोघे रा.धामणी ता.आंबेगाव) बिगर परवाना देशी-विदेशी दारूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, पोलिस जवान फिरोज मोमीन, पोलीस नाईक एस एन नाडेकर यांनी रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेल जय मल्हार येथे छापा मारला. त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच अमोल जाधव व राहुल जाधव पळून गेले असून त्या ठिकाणी देशी व विदेशी बनावटीची २९ हजार ३८७ रुपये किमतीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तानाजी हगवणे करत आहेत.

Web Title: 29,000 worth of liquor seized in Manchar