शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धडाकेबाज! ८ महिन्यात २९ कारवाया अन् १७९ गुन्हेगारांवर मोक्का; ओंकारसिंग टाक टोळीवर मोक्का कारवाई     

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 21:56 IST

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ८ महिन्यात करण्यात आलेली ही २९ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. 

पुणे : जागा खाली कर अन्यथा आम्हाला २ लाख रुपये खंडणी मागणार्‍यांना नकार दिल्याने तलवार डोक्यात घालून खुनाचा प्रयत्न करणार्‍या हडपसर येथील ओंकारसिंग टाक टोळीवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ८ महिन्यात करण्यात आलेली ही २९ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख ओंकारसिंग करतारसिंग टाक (वय २६), सोरनसिंग करतारसिंग टाक (वय २१), अवतारसिंग करतारसिंग टाक (वय २८), जपानसिंग करतारसिंग टाक (वय ३१), तुफानसिंग करतारसिंग टाक (वय ३०, सर्व रा. गाडीतळ, हडपसर) यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ओंकारसिंग टाक याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने बेकायदेशीर टोळी तयार करुन खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करुन दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, दरोडा टाकणे, खंडणी वसुल करणे अशा प्रकारची कृत्ये केली आहेत. त्यामुळे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी या प्रस्तावाची छाननी करुन त्याला मंजुरी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे करत आहेत.

अमिताभ गुप्ता यांनी गेल्या वर्षी २० सप्टेंबर २०२० रोजी पुणे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगारांविरुद्ध त्यांनी मोहिम उघडली. त्यात सराईत गुन्हेगारांवर तडीपारी, मोका, एमपीडीएचा प्रभावी वापर करण्यात आला. अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही २९ वी कारवाई आहे. या वर्षातील ही २४ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcommissionerआयुक्त