शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरूनगर : २८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, डॉक्टरला गंभीर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:31 IST

राजगुरूनगर येथील घटना...

राजगुरुनगर : चांडोली फाटा येथे खाजगी रुग्णालयात २८ वर्षीय महिलेवर औषध उपचार सुरु असताना मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून डॉक्टरला नातेवाईकांनी गंभीर मारहाण केली. तसेच रुग्णालयाच्या काचा फोडल्याची घटना (दि ६ ) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडुस तुरुकवाडी (ता. खेड ) येथील निलोफर शमसुद्दीन मोमीन या २८ वर्षीय विवाहित महिलेने घरगुती कारणावरून विष प्राशन केले होते. पुढील औषध उपचारासाठी ४ दिवसांपूर्वी चांडोली फाटा येथील जीवनरक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दि. ६ रोजी दुपारी या महिलेचा उपचारादरम्यान मुत्यू झाला. रुग्ण दगावला कसा? अशी विचारणा संतप्त नातेवाईकांनी करत डॉ. रमेश शेजुळ (रा. राक्षेवाडी ता खेड ) यांना डोक्याला सॅनिटायझरच्या लोखंडी स्टँडने मारहाण केली.

तसेच हॉस्पिटलच्या काचा फोडल्या, या मारहाणीत डॉ. शेजुळ गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी चाकण येथे हलविण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक सतीश गुरव, पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार संतोष घोलप, संदिप भापकर, नवनाथ थिटे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमलेल्या जमाव व नातेवाईकांना शांत केले. याबाबत खेड पोलिस ठाण्यात दोन्ही बाजुने गुन्हा दाखल काम करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKhedखेडkhed policeखेड पोलीस