शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वरवरा राव निर्दाेष सुटतील ; तेलंगणातील 26 लेखक, विचारवंतांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 21:26 IST

माओवादी प्रकरणात अटकेत असलेल्या वरवरा राव यांच्या समर्थनार्थ तेलंगणातून आज 26 लेखक, विचारवंत पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात आले हाेते.

पुणे : माओवादी प्रकरणात अटकेत असलेल्या वरवरा राव यांच्या समर्थनार्थ तेलंगणातून आज 26 लेखक, विचारवंत पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात आले हाेते. वर वरा राव यांच्या जामीनावर आज सुनावणी हाेणार हाेती. परंतु काही कारणास्तव सुनावणी हाेऊ शकली नाही. वर वरा राव एक विचारवंत, कवी असून ते माओवादी प्रकरणातून निर्दाेष सुटतील असा विश्वास या लेखकांनी यावेळी व्यक्त केला. 

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आराेपावरुन विचारवंत वरवरा राव यांना पुणे पाेलिसांनी अटक केली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ते कारागृहात आहेत. आज त्यांच्या जामीनावर सुनावणी हाेणार हाेती. परंतु काही कारणास्तव त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही. वरवरा राव यांच्या समर्थनार्थ तेलंगणामधून 26 लेखक, विचारवंत, कलाकार आणि विविध क्षेत्रातील लाेक खासगी बसने पुण्याला आले हाेते.  राव यांना पाहता येईल या हेतूने ते पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात आले हाेते, परंतु त्यांची निराशा झाली. राव हे निर्दाेष असून यापूर्वीही त्यांना खाेट्या खटल्यांमध्ये अटक करण्यात आली हाेती. त्या खटल्यांमधून त्यांना निर्दाेष साेडण्यात आले हाेते, या खटल्यामधून देखील ते निर्दाेष सुटतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. 

तेलंगणाच्या एका खासगी मॅगझीनचे संपादक असलेले एन नारायण म्हणाले, आज आम्ही वरवरा राव यांना पाहता येईल या आशेने पुण्याला आलाे हाेताे. परंतु आमची निराशा झाली. त्यांना काही कारणास्तव आज न्यायालयात हजर करण्यात आले नाही. आम्ही तेलंगणामधील 26 कवी, लेखक आणि विविध क्षेत्रातील लाेक असे आलाे हाेताे. राव हे तेलंगणातील प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्यावर खाेटे खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा माओवाद्यांशी कुठलाही संबंध नाही. या आधीही त्यांच्या विराेधात 25 केसेस दाखल करण्यात आल्या हाेत्या. त्यांच्यामधून त्यांची न्यायालयाने निर्दाेष सुटका केली. परंतु या सगळ्यात त्यांना 7 वर्षे कारागृहात घालवावी लागली. माओवादी खटल्यामधून देखील त्यांची निर्दाेष सुटका हाेईल. राज्य सरकार खाेट्या खटल्यांमध्ये त्यांना गाेवून त्यांना त्रास देत आहे. राव यांच्या अटकेतून इतर विचारवंतांनी बाेलू नये असाच संदेश सरकार समजात देत आहे. माेदींच्या कार्यकाळात फॅसिस्ट शक्ती जाेर धरत आहेत. या आधीच्या खटल्यांमध्ये त्यांच्यावर आत्ताच्या खटल्याप्रमाणेच आराेप लावण्यात आले हाेते. या खटल्यात माेदींच्या खुनाचा कट रचण्यात आल्याचे म्हंटले हाेते, परंतु चार्जशीटमध्ये त्याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. माध्यमांसमाेर सांगण्यासाठी हा आराेप लावण्यात आला हाेता. या खटल्यातून देखील राव हे निर्दाेष सुटतील असा आम्हाला विश्वास आहे.  

दरम्यान या 26 लाेकांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या देवीप्रिया सुद्धा हाेत्या. देवीप्रिया यांनी फेब्रुवारी महिन्यात राव यांच्या समर्थनार्थ एक कवी संमेलन घेतले हाेते, त्यावेळी पुण्याला येण्याचे ठरवण्यात आले हाेते. आज शिवाजीनगर न्यायालयात येण्यापूर्वी या विचारवंतांनी काेरेगाव भीमा विजयस्तंभाला भेट दिली. तसेच फुले वाड्यालाही भेट देण्यात आली.  

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणेCourtन्यायालयTelanganaतेलंगणा