शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

भामा आसखेड जॅकवेलच्या पूर्णत्वाला २६ जानेवारीची डेडलाईन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 17:39 IST

महापालिका भामा आसखेड धरणामधून शहरासाठी पाणी आणणार आहे...

ठळक मुद्दे पाण्याच्या शुध्दीकरणासाठी चाकणमध्ये जलशुध्दीकरण केंद्र वडगाव शेरी, विमाननगर, खराडी आणि चंदननगर या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटणार

पुणे : पुण्याच्या पूर्वी भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने भामा आसखेड धरणामधून पाणी आणण्याच्या कामाला मे महिन्यात पोलीस बंदोबस्तामध्ये सुरुवात केली. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी २६ जानेवारी २०२० ची डेडलाईन ठरविण्यात आली आहे. त्यामुळे चाकण येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या कामालाही गती देण्यात आली आहे.महापालिका भामा आसखेड धरणामधून शहरासाठी पाणी आणणार आहे. या योजनेमधून शहराच्या पूर्वभागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. पुणे नगर रस्त्यावरील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव. धानोरी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, खराडी आणि चंदननगर या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गेली अनेक वर्ष स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम रखडले होते. जमिनीच्या बदल्यात जमीन अशी शेतकऱ्यांची मागणी होती.   शासनाने हेक्टरी १५ लाख रुपये मोबदला जाहीर केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी काही प्रमाणात विरोध सुरुच ठेवला होता. पालिकेने नुकतेच मोबदल्यापोटी देण्यात येणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या जॅकवेलमधून पाणी उपसण्याचे आणि पंप बसविण्याचे काम सुरु करण्यात आले होते. या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन होते. पावसाळ्यात कामाचा वेग मंदावल्याने उद्घाटनाची तारीख जानेवारी महिन्यात जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या प्रकल्पाचे काम आणि सिंचन पुनर्स्थापना खर्च किंवा प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात १८५ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.  ====  भामा आसखेडच्या जॅकवेलमधून उचलले जाणाऱ्या पाण्याच्या शुध्दीकरणासाठी चाकणमध्ये जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. हे काम साधारणपणे २०१५-१६ मध्ये सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत ७० टक्क्यांच्या आसपास काम पूर्ण झाले असून पालिकेने त्यासाठी दहा एकर जागा संपादीत केली होती. भामा आसखेड जॅकवेलसह चाकण येथील जलशुद्धीकरण केंद्राचे कामही वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका