स्पीडबॉल स्पर्धेत २५३ खेळाडूंचा सहभाग
By Admin | Updated: April 26, 2016 01:46 IST2016-04-26T01:46:14+5:302016-04-26T01:46:14+5:30
दुसऱ्या राज्यस्तरीय सबज्युनिअर स्पीडबॉल क्रीडा स्पर्धेत १५ जिल्ह्यातील २५३ खेळाडू सहभागी झाले होते.

स्पीडबॉल स्पर्धेत २५३ खेळाडूंचा सहभाग
इंदापूर : महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय सबज्युनिअर स्पीडबॉल क्रीडा स्पर्धेत १५ जिल्ह्यातील २५३ खेळाडू सहभागी झाले होते.
नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा स्पीडबॉल असोसिएशन, पुणे मनपा स्पीडबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुकुंद शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.