शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

महाविध्वंसक भूकंपानंतरची २५ वर्षे, दगड-मातीचे ढिगारे अन् मृत्यूचे तांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 02:25 IST

पुणे महापालिकेच्या पथकाचे उल्लेखनीय काम : चार दिवस दोन गावांत मदतकार्य

पुणे : भूकंपाने सर्व घरे दगड-मातीचे ढीग बनले होते. रस्त्यांचे अस्तित्वही दिसत नव्हते. त्यातच पावसाची रिपरिप. ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत सापडण्याची शक्यताही धुसर होती. अशा कठीण परिस्थतीत पुणे महापालिकेच्या ४०० जणांच्या पथकाने राजेगाव आणि चिंचोली रेबे या दोन गावांमध्ये चार दिवस मदतकार्य केले. या पथकातील तत्कालीन नगरसेवक अंकुश काकडे व तत्कालीन सहायक आरोग्य प्रमुख डॉ. दिलीप परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना या घटनेच्या आठवणी जागविल्या.

लातूर भूकंपाला रविवारी (दि. ३०) २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या भूकंपानंतर मदतीसाठी अनेकांचा हात पुढे सरसावले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सर्वांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार पुणे महापालिकेचे काही नगरसेवक, आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांची चारशे जणांची टीम उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील राजेगाव व चिंचोली रेबे या गावांत चार दिवस तळ ठोकून होती. या गावातील ढिगारे उपसणे, मृतदेहांची विल्हेवाट लावणे, गरजूंना मदत करण्याचे काम या पथकावर होते. हे पथक दि. १ आॅक्टोबरला सायंकाळी आठ पीएमटी बस व तीन ट्रकसह पुण्यातून रवाना झाले. सोबत खाण्यापिण्याचा सर्व लवाजमा, आचारी होते. दुसºया दिवशी शनिवारी पहाटे या गावांमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच कामाला सुरूवातही झाली.दगड मातीचे बांधकाम असलेली घरे पूर्णपणे जमीनदोस्त झालेली. तर सिमेंट काँक्रिटची घरे तग धरून उभी होती. अशाप्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचा कुणालाच अनुभव नव्हता. त्यामुळे सर्वांना कामाच्या जबाबदाºया वाटून देण्यात आल्या. त्यासाठी चार-पाच स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या.पहिल्या दिवशी ढिगाºयाखालून ६ ते ७ मृतदेह बाहेर काढले. तसेच ८ ते १० जनावरेही काढण्यात आली. असा पहिलाच अनुभव असल्याने अनेकांच्या मनात भीती होती. पण मदतीच्या भावनेने सर्वांनी झोकून देऊन काम करण्यास सुरुवात केली. सकाळी उजाडल्या पासून रात्री सूर्यास्तापर्यंत ढिगारे उपसणे, मृतदेह बाहेर काढणे सुरू होते. चार दिवसांत अनेक घरांचे ढिगारे उपसले.पावसामुळे चिखल झाल्याने अनेक अडचणी येत होत्या. त्यात १५ ते २० मृतदेह सापडले. रात्री बस किंवा ट्रकमध्ये झोपावे लागत होते. वीज नसल्याने बसच्या उजेडात आचारी जेवण तयार करायचे. जेवण काय तर डाळ-खिचडी. त्यावर मात करून या पथकाने अत्यंत शिस्तबद्धपणे केलेल्या कामाचे शरद पवार यांच्यासह अनेकांनी कौतूक केले.तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार पथकाने दोन्ही गावांत मोठे मदतकार्य केले. आम्ही पुण्यातूनच शिधा, आवश्यक हत्यारे असे सर्व साहित्य घेऊन गेल्याने तिथे कुणावरही कसलाच ताण पडला नाही. अत्यंत भयानक स्थितीत सर्वांनी काम केले. हे पालिकेचे सर्वांत मोठे एकमेव पथक होते. या मदतकार्यात सहभागी होता आले याचे समाधान वाटते. - अंकुश काकडे,तत्कालीन नगरसेवक, प्रवक्ते, राष्ट्रवादीपथकातील सर्व कर्मचारी व अधिकाºयांच्या कामाचे नियोजन, राहणे, जेवणाची व्यवस्था याची जबाबदारी माझ्यावर होती. अशा परिस्थितीत काम करण्याचा कुणालाच अनुभव नसल्याने मोठी समस्या होती. पण योग्य नियोजन व खबरदारीमुळे आम्ही चांगले काम केले. त्या वेळी अत्यंत खडतर परस्थिती असल्याने आज २५ वर्षांनंतरही अंगावर शहारे येतात.- डॉ. दिलीप परदेशी,तत्कालीन सहायक आरोग्य प्रमुख

 

टॅग्स :PuneपुणेKillari Earthquakeकिल्लारी भूकंप